Type Here to Get Search Results !

'फ्रेंडशिप डे' साजरा करताना घात झाला; मित्र सेल्फी काढण्यात व्यस्त होते आणि...

: जिल्ह्यात धरण, तलाव, धबधबे आणि समुद्र किनाऱ्याच्या लगत जाण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. मात्र असं असतानाही पालघर तालुक्यातील सफाळे येथील रोडखड धरणाजवळ 'फ्रेंडशिप डे' साजरा करण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांपैकी तन्मेष विकास तरे वय १७ वर्ष या तरुणाचा धरणात झाल्याची घटना घडली आहे. तालुक्यातील एडवण गावातील १६ ते १७ विद्यार्थी 'फ्रेंडशिप डे' साजरा करण्यासाठी रविवारी दुपारी सफाळे जवळील रोडखड धरणाजवळ जमले होते. यातील काही विद्यार्थ्यांना धरणाच्या पाण्यात उतरण्याचा मोह आवरला नाही. या मुलांसह तन्मेष हा देखील पाण्यात उतरला आणि पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडाला. त्याचे अनेक सहकारी मित्र हे सेल्फी काढण्यात इतके मश्गूल होते की आपला मित्र पाण्यात कधी बुडाला याचा थांगपत्ताच त्यांना लागला नसल्याचे पोलिसांनी सांगितले. काही वेळानंतर तन्मेष हा आपल्या सोबत नसल्याचे सर्वांच्या लक्षात आल्यावर सर्वांनी धावाधाव सुरू केली. जिल्हाधिकाऱ्यांनी धरण, तलाव, धबधबे आणि समुद्र किनाऱ्याच्या लगत जाण्यास प्रतिबंध घातला असताना त्या सूचनांकडे दुर्लक्ष केले जात आहे. यामुळे अशा दुर्घटनांमध्ये वाढ होत आहे. दरम्यान, स्थानिकांच्या मदतीने मृत तन्मेष तरे याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. याप्रकरणी सफाळे पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3fkmysP

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.