Type Here to Get Search Results !

Weather Alert : पुण्यासह 'या' जिल्ह्यांसाठी पुढचे ३ तास महत्त्वाचे, हवामान खात्याकडून अलर्ट जारी

मुंबई : आठवडाभर धुमशान घातल्यानंतर गेल्या तीन ते चार दिवसांपासून राज्यात पावसाने दडी मारली आहे. राज्यात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण असून पुन्हा एकदा मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे. पुढील तीन तासात पुण्यात 64 जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. पुणे (Pune), ठाणे(Thane), रायगड (Raigad)साताऱ्यामध्ये (Satara)पुढच्या तीन तासात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे या सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज सकाळपासूनच ३० ते ४० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. तर मुंबईत अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. मुंबईसह अनेक उपनगरांमध्येही हलक्या पावसाच्या सरी कोसळू शकतात. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, रायगड आणि रत्नागिरीमध्ये पुढचे चार दिवस अतिवृष्टी होणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पुणे आणि सातारा जिल्ह्यात पुढचे तीन दिवस अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. इतकंच नाहीतर कोल्हापूरमध्ये अतिवृष्टी होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे सर्व गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. रायगड, रत्नागिरी, पुणे, कोल्हापूरसह काही जिल्ह्यात हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात अतिवृष्टीचा अंदाज वर्तविला जात होता. परंतु परिस्थिती अतिवृष्टीच्या पलीकडे गेली होती आणि पूर परिस्थितीला सामोरे जावे लागले.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2WCldan

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.