Type Here to Get Search Results !

pegasus spyware: 'पेगॅससद्वारे सामान्य नागरिकांवरही पाळत'; जितेंद्र आव्हाड यांचा नागरिकांना 'हा' सल्ला

मुंबई: हेरगिरी प्रकरणावरून संपूर्ण देशभरात केंद्र सरकारच्या विरोधात सूर ऐकू येत आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या घटक पक्षांनीही याबाबत आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. आता राज्याचे गृहनिर्माण मंत्री यांनी पेगॅससच्या मुद्दयावर केवळ राजकारणी, सामाजिक कार्यकर्ते किंवा पत्रकारांना नाही, तर सर्वसामान्य नागरिकांनाच सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. (state housing minister criticizes modi govt over and warns citizens) जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत सर्वसमान्यांना हा सावधगिरीचा इशारा दिला आहे. केंद्र सरकार तुमचे व्हॉट्सअॅप, एसएमएस, तु्म्ही पाठवलेले व्हिडिओ, फोटो, तुमचे मेडिकल रिपोर्ट्स, तुमची पेमेंट हिस्ट्री आणि तुमचे कॉन्टॅक्ट अशा सर्व गोष्टी वाचत आहे, माहिती घेत आहे. तेव्हा पेगॅसस हे केवळ राजकारणी किंवा पत्रकार अथवा सामाजिक कार्यकर्त्यांशीच संबंधित आहे असे नाही, तर ते तुमच्याशी देखील संबंधित आहे, असे आव्हाड यांनी म्हटले आहे. क्लिक करा आणि वाचा- केंद्र सरकारने पेगॅसससंदर्भातील सर्व आरोप फेटाळले जितेंद्र आव्हाड यांनी केंद्र सरकारवर हा आरोप केला असला तरी केंद्र सरकारने मात्र अशा प्रकारचे सर्व आरोप फेटाळले आहेत. या आरोपाला कोणताही ठोस आधार किंवा पुरावा नसल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. क्लिक करा आणि वाचा- नेमके काय आहे पेगॅसस? पेगॅसस हा एक स्पायवेअरचा प्रकार आहे. लोकांच्या मोबाइल फोनच्या आधारे पेगॅसस स्पायवेअरच्या माध्मातून हेरगिरी केली जाते. पेगॅससद्वारे एक लिंक पाठवण्यात येते. जर वापरकर्त्याने त्या लिंकवर क्लिक केले तर त्याच्या फोनवर मालवेअर किंवा मग देखरेखीसाठी परवानगी असलेला कोड इन्टॉल होतो. आता तर मालवेअरच्या नवीन व्हर्जनमध्ये कोणत्याही लिंकवर क्लिक नाही केले तरी चालते. एकदा का पेगॅसस इन्टॉल झाला की मग हल्लेखोराकडे वापरकर्त्याच्या फोनची सर्व माहिती येते. क्लिक करा आणि वाचा-


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3BYXQYE

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.