Type Here to Get Search Results !

महाडमध्ये MIDC कारखान्यात भीषण स्फोट, पुराच्या धोक्यात शहरात आगीचे लोळ

महाड : पावसाने महाडमध्ये पूर आला असतानाच आता आणखी एक संकट समोर आले आहे. महाडमधील एमआयडीसी कारखान्यांमध्ये रात्रीच्या सुमारास भीषण स्फोट झाला. स्फोटानंतर कारखान्याला भीषण आग लागली असून सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाल्याचे समोर आले नाही. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विनती ऑरगॅनिक कारखान्यांमध्ये ही भीषण आग लागली आहे. खरंतर, आधीच महाडवर महापुराचं संकट आहे. त्यात या भीषण स्फोटामुळे नागरिक मोठ्या प्रमाणात घाबरले आहेत. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहे. लॉकडाऊन आणि मुसळधार पावसामुळे कारखाना बंद होता. त्यामुळे मोठी जीवितहानी टळल्याची माहिती आहे. महाडमध्ये मुसळधार पाऊस सुरू असून संपूर्ण शहराला पूर आला आहे. यातच महाडमध्ये 32 घरांवर दरड कोसळली यामध्ये ७० ते ७५ जण अडकले असल्याची माहिती आहे. त्यामुळे जिल्ह्यात भीषण परिस्थिती ओढावली असून नागरिकांना रेस्क्यू करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वचावकार्यही सुरू आहे. रायगड जिल्ह्यातील माणगाव, महाड परिसराला अतिवृष्टीचा तडाखा बसल्यानंतर विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर तातडीने रात्री उशिरा माणगावमध्ये दाखल झाले. त्यांच्यासोबत माजी मंत्री व आमदार गिरीश महाजन, आमदार निरंजन डावखरे हे आहेत. भर पावसात प्रवास करत दरेकर हे माणगाव जवळील तासगाव टोल नाक्यापर्यत कसेबसे पोहचले परंतु, पुढे रस्त्यावर जवळ जवळ सहा फूट पाणी असल्याने त्यांना थांबावे लागले आहे. पुढील मार्ग बंद करण्यात आले असून तिथपर्यंत एनडीआरएफची रेस्क्यू टीमही पोहचली आहे. त्यांच्यासोबत दरेकर यांनी चर्चा करून येथील पूरपरिस्थितीची व बचावकार्याची माहीती घेतली.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2W33nNg

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.