Type Here to Get Search Results !

cow sold for rs 1,61000: गायीची १ लाख ६१ हजारांना विक्री; मालकीणबाई गायीच्या गळ्यात पडून रडल्या

कोपरगाव: तब्बल १ लाख ६१ हजार रुपयांना.... ऐकून विश्वास बसणार नाही, पण हे खरे आहे. तालुक्यातील कुंभारी या गावात हा खरेदी-विक्रीचा व्यवहार झाला आहे. कुंभारीचे रहिवासी अरुण रघुनाथ कदम यांची ही गाय होती. ही गाय एच. एफ. होस्टेन दुसऱ्या विताची पाच वर्ष वयाची आहे. ही गाय १ लाख ६१ हजाराला राहता तालुक्यातील निर्मळ पिंप्रि येथील व्यापारी सिंकदर पठाण यांनी रोख रक्कम देत खरेदी केली. गाईला चांगली किंमत मिळाल्याने शेतकरी अरुण कदम यांनी गुलालाची उधळण करत डीजेच्या सुरात मिरवणूक काढत गायीला रवाना केले. हा सोहळा बघण्यासाठी सारा गाव एकवटला होता. ( in of ) गायीची मिरवणूक निघाली तेव्हा अनेकांनी गाण्यावर ठेका धरला. तर गायीची पाठवणी करतांना मालकीणीच्या डोळ्यात मात्र अश्रु उभे राहिले. हे पाहून समस्त गावकरीही भावुक झाले. क्लिक करा आणि वाचा- गुरुवारी दुपारी कदम यांची गाय वरील रकमेस विकली गेल्याची बातमी गावात पसरताच गाय व व्यापारी बघण्यास ग्रामस्थ गोळा झाले. गायीची शरीरयस्टी, रंग उंची, कासेचा भरणा पाहून जो-तो कदम यांची स्तुती करत होता. क्लिक करा आणि वाचा- गाय तीस लिटवर देणार दूध गायीच्या विक्री बद्दल बोलताना कदम यांनी सांगितले की, मागील वितामध्ये सत्तावीस तर या वेळेला तीस लिटरच्या पुढे गाय दूध देईल. गोठ्यात सर्व एच एफ होस्टेन जातीच्या गायी असून खाद्य, तिला चारा आणि पोषक घटकांचा समावेश असलेला खुराक वेळोवेळी दिला जातो. एक हेक्टर क्षेत्रावर केवळ चारा पिकांची लागवड केलीली असल्याने मेहनतीच्या जोरावर असे भरघोस ऊत्पन मिळत आहे असे कदम यांनी सांगितले. क्लिक करा आणि वाचा- कोळपेवाडी येथील मध्यस्थी राजेंद्र महाजन व्यापारी पठाण व कदम यांचा गावकऱ्यांनी फेटा बांधून सत्कार केला. वाजत्र्यांच्या ठेक्यावर गुलाल उधळत गायीची निघालेली वरात आणि तिची पाठवणी करताना वाजत्र्यांच्या मुखातून, 'बाबुल की दुवाएँ लेती जा हे प्रसिद्ध गाणे वाजले. तेव्हा गायीच्या मालकीण सुवर्णा यांनी गळ्यात पडत साश्रू नयनांनी गायीला निरोप दिला.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3C0yJEM

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.