औरंगाबाद: सेलू (जि.परभणी) येथील उपविभागीय पोलिस अधिकारी व पोलिस नाईक यांनी एका प्रकरणात दोन कोटींची मागितली. तडजोडीनंतर दीड कोटी ठरलेल्या रकमेतून दहा लाख घेताना मुंबईच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने कारवाई केली, असे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, मुंबईचे सहायक पोलिस आयुक्त आबासाहेब पाटील यांनी शनिवारी (२४ जुलै) सकाळी प्रसिद्धी पत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे. या कारवाईने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र गमकरण पाल व पोलीस नाईक गणेश लक्ष्मणराव चव्हाण या दोघाविरुद्ध सेलू पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता या प्रकरणात पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3zu9MiV