Type Here to Get Search Results !

दोन डोस घेतलेत त्यांना मुंबईत सवलती?; लोकलबाबत BMCने दिले 'हे' उत्तर

मुंबई: संसर्गाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन महापालिका प्रशासन आतापासूनच आवश्यकती पावले उचलत आहे. ही लाट आलीच तर त्याचा सक्षमपणे मुकाबला करण्यासाठी आरोग्य सुविधा वाढवण्यावर भर देण्यात येत आहे. त्याचवेळी मुंबईत सध्या जे निर्बंध लागू आहेत त्यात शिथीलता देण्याबाबतही पालिकेने सावधपणाने पावले टाकायचे ठरवले आहे. पालिकेचे अतिरिक्त आयुक्त यांनी आज याबाबत माहिती दिली व सर्वांसाठी केव्हा खुली होणार यावरही ते बोलले. ( ) वाचा: करोनाची तिसरी लाट येईल हे गृहित धरून पालिका प्रशासन सतर्क झाले आहे. मुंबईत कोविड साथीच्या अनुषंगाने ज्या सुविधा उभारण्यात आलेल्या आहेत त्या सक्षम केल्या जात आहेत. त्यासोबत नव्यानेही सुविधा उभ्या करण्यात येत आहेत. मालाड येथील जंबो कोविड सेंटर आमच्या ताब्यात आलं आहे. तिथे सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. त्याशिवाय या महिनाअखेरपर्यंत आणखी तीन जंबो कोविड सेंटर पूर्णत्वास येणार आहेत. प्रामुख्याने बेड्सची संख्या वाढवणे, उपचारांबाबत गैरसोय होऊ नये यासाठी तयारी करणे आणि ऑक्सिजनची मुबलक उपलब्धता यावर आम्ही भर देत आहोत. करोनाची तिसरी लाट येऊ नये असे वाटत असले तरी ही लाट आली तर जी स्थिती उद्भवेल त्यास तोंड देण्यासाठी आम्ही सज्ज आहोत, असे काकाणी यांनी सांगितले. कोविडच्या दुसऱ्या लाटेपेक्षा तिसऱ्या लाटेची तीव्रता कमी असेल असं केंद्राचं म्हणणं आहे. ही दिलासा देणारी बाब असली तरी रुग्णसंख्या वाढल्यास कुठेही पालिकेची यंत्रणा कमी पडू नये, यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचेही काकाणी यांनी नमूद केले. वाचा: मुंबईत ५० टक्केपेक्षा जास्त नागरिकांनी ' 'चा पहिला डोस घेतला आहे तर १५ टक्केपेक्षा जास्त नागरिकांनी दोन्ही डोस घेतले आहेत. यात ज्यांनी दोन डोस घेतलेत त्यांच्यासाठी काही सवलती देण्याचा विचार सुरू आहे. या सवलती नेमक्या कोणत्या असतील याबाबत अंतिम निर्णय येत्या आठ दिवसांत घेतला जाईल, असे काकाणी यांनी सांगितले. अशा नागरिकांना लोकलमधून प्रवास करण्याची मुभा मिळणार का?, असे विचारले असता लोकलवर निर्बंध लावताना वा ते शिथील करताना मुंबईसोबतच मुंबई महानगर प्रदेशाचाही विचार करावा लागतो. खरंतर त्यापुढेही आता लोकल जाते. त्यामुळे या संपूर्ण भागात कोविडची स्थिती काय आहे, ते पाहून निर्णय घेतला जात असतो. हा निर्णय पूर्णपणे राज्य सरकारच्या स्तरावरचा आहे आणि आम्ही केवळ कोविडची ताजी आकडेवारी व अन्य माहिती सरकारकडे पाठवत असतो, असे काकाणी यांनी स्पष्ट केले. मुंबईतील म्युकरमायकोसिसचे रुग्ण आता कमी झाले आहेत. मूळातच मुंबईत म्युकरचे जे रुग्ण होते त्यापैकी दोन तृतियांश रुग्ण हे मुंबईबाहेरचे होते. हे रुग्ण आता बरे होऊन घरी परतत आहेत. स्थिती आता नियंत्रणात आहे, असेही एका प्रश्नाच्या उत्तरात काकाणी म्हणाले. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3AMrrnx

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.