Type Here to Get Search Results !

कोल्हापुरात करोना अजूनही नियंत्रणाबाहेर; आता उचलणार 'हे' पाऊल

कोल्हापूर: संसर्गाच्या अनुषंगाने आरोग्य विभागाने टेस्टिंगचे प्रमाण वाढवावे जेणेकरून जिल्ह्याचा करोना पॉझिटिव्हिटी रेट कमी होण्यास मदत होईल. या स्थितीत नागरिकांनीही जबाबदारीने वागून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन ग्रामविकास मंत्री यांनी केले. ( ) वाचा: जिल्हाधिकारी कार्यालयात हसन मुश्रीफ यांनी करोना आढावा बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी महत्त्वाच्या सूचना केल्या. कोल्हापूर जिल्ह्यातील कारखाने, खासगी आस्थापना, बँका, कंपन्या यांनी मानवी दृष्टीकोनातून कोविड प्रतिबंधक लसीकरण वाढवण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करताना होम आयसोलेशन बंद करण्यात यावे, अशी महत्त्वाची सूचना मुश्रीफ यांनी यावेळी केली. नागरिक, व्यापारी यांनी संयम बाळगावा असे सांगताना लवकरच जिल्ह्यातील करोनाचा आलेख कमी होईल, असा आशावाद श्रीफ यांनी व्यक्त केला. वाचा: ऑक्सिजन पुरवठा, लसीकरण, जिल्ह्यातील पॉझिटिव्हिटी रेट, टेस्टिंग, आदींचा यावेळी विस्तृत आढावा मुश्रीफ यांनी घेतला. सध्या सीपीआरमध्ये ४८० रुग्ण दाखल असून त्यापैकी ३७८ रुग्ण कोविडचे आहेत. या दाखल रुग्णांपैकी ७५ रुग्ण व्हेंटिलेटरवर तर २७८ रुग्ण ऑक्सिजनवर असल्याची माहिती वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे यांनी दिली. यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. कांदबरी बलकवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल माळी, जिल्हा आरोग्य अधिकारी योगेश साळे, जिल्हा नियोजन अधिकारी विजय पवार आदी उपस्थित होते. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3hZNFdf

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.