Type Here to Get Search Results !

रायगड, रत्नागिरीला ऑरेंज अॅलर्ट; गुरुवार, शुक्रवार पुन्हा पाऊस?

रायगड, रत्नागिरी भागांत चिंता म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईः गेल्या आठवड्यातील पावसानंतर पुन्हा पावसाचा कहर नको, अशी मनोमन प्रार्थना कोकणावासीय करत आहेत. मात्र सोमवारी जाहीर झालेल्या पूर्वानुमानानुसार गुरुवारी आणि शुक्रवारी आणि रत्नागिरीला ऑरेंज अॅलर्ट देण्यात आला आहे. या काळामध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार ते तीव्र मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. गेल्या आठवड्यात रेड अॅलर्टच्या दिवशी पावसाचा धुमाकूळ अनुभवायला आल्यानंतर आता पुन्हा अस्मानी संकट नको, अशी भावना व्यक्त होत आहे. पावसाळ्याच्या ऋतुमध्ये १ जूनपासून २६ जुलैच्या सकाळी ८.३० वाजेपर्यंत रत्नागिरीमध्ये २ हजार ९११ मिलीमीटर पाऊस पडला आहे. सरासरी पहिल्या दोन महिन्यांमधील पाऊस हा १ हजार ७७३ मिलीमीटर इतका असतो. रायगडमध्ये २ हजार ४२६ मिलीमीटर पाऊस २६ जुलैच्या सकाळी ८.३० वाजेपर्यंत नोंदला गेला आहे. हा पाऊस १ हजार ६४९ मिलीमीटर इतका असतो. रत्नागिरीमध्ये आत्तापर्यंतच्या सरासरीपेक्षा ६४ टक्के अधिक तर रायगडमध्ये ४७ टक्के अधिक पाऊस पडला आहे. सिंधुदुर्गामध्ये २६ जुलैपर्यंत २ हजार ६५० मिलीमीटर पावसाची नोंद झाली तर सरासरी पाऊस १ हजार ७५१ मिलीमीटर इतका आहे. गेल्या आठवड्याभरातील पावसाच्या कहरानंतर या आठवड्यात बुधवारपर्यंत रायगड आणि रत्नागिरीमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार सरींचा इशारा देण्यात आला आहे. मात्र गुरुवारी याची तीव्रता वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सिंधुदुर्गात मात्र शुक्रवारपर्यंत तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज आहे. घाटमाथ्यावरही शुक्रवारसाठी ऑरेंज अॅलर्ट देण्यात आला आहे. मंगळवारपासून गुरुवारपर्यंत पुणे, कोल्हापूर, सातारा या परिसरातील घाट भागांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर शुक्रवारी याची तीव्रता वाढून तुरळक ठिकाणी मुसळधार ते तीव्र मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पावसाचा जोर ठाण्यामध्येही बुधवारपासून किचिंत वाढेल असा अंदाज आहे. तर पालघरमध्ये गुरुवारपासून आणि मुंबईमध्ये शुक्रवारी तुरळक ठिकाणी मुसळधार सरींचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उर्वरित महाराष्ट्रात मात्र हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरींची शक्यता आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/371SNZ9

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.