: आधुनिक काळात इंटरनेटचे जवळपास प्रत्येकाच दैनंदिन जीवनात अनेक फायदे होतात. मात्र याच इंटरनेचा गैरवापर करून एखाद्या आयुष्यही उद्धवस्त केली जाऊ शकतं. बुलडाणा जिल्ह्यात अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील एका महिला पोलिस कर्मचाऱ्याने आपले खासगी फोटो जी-मेल अकाऊंटवर ठेवले असता अज्ञात व्यक्तीने ते अकाऊंट हॅक करून सदर महिला कर्मचाऱ्याचे नग्न फोटो व्हायरल (Female police officer nude photo viral) केल्याची घटना घडली आहे. बुलडाणा जिल्हा पोलिस दलात कार्यरत असलेल्या एका महिला पोलिस कर्मचाऱ्याचे नग्न फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे जिल्हा पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पीडित महिला पोलिस कर्मचाऱ्याने दिलेल्या तक्रारीवरुन बुलडाणा शहर पोलिस स्टेशनला आक्षेपार्ह फोटो व्हायरल करणाऱ्या मोबाईल नंबर धारकावर विनयभंगसह आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा पोलिस दलात कार्यरत असलेल्या एका महिला कर्मचाऱ्याचे अंघोळ करतानाचे नग्न फोटो तिच्या ईमेल आयडीवर सेव्ह होते. हा ईमेल आयडी हॅक करुन जवळपास ३० नग्न फोटो पीडित महिला पोलिस कर्मचाऱ्याच्या मैत्रिणीच्या मोबाईल नंबरवर ७०५८७२५५०८ या क्रमांकावरून अश्लील संदेश लिहून १७ जुलै रोजी पाठवण्यात आले. ही बाब पीडित महिला पोलिस कर्मचाऱ्याच्या लक्षात येताच तिने १८ जुलै रोजी बुलडाणा शहर पोलिसात तक्रार दाखल केली आहे. यावरुन अज्ञात मोबाईल धारक क्र. ७०५८७२५५०८ असलेल्या आरोपीवर विनयभंगची कलम ३५४, ३५४ (ड), आयटीअॅक्टचे ६६ (सी), ६६ (ई), ६७ (ए) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी पुढील तपास सायबर सेलकडे वर्ग करण्यात येणार आहे. तपासाअंती सदर महिला पोलिस कर्मचाऱ्याचे नग्न फोटो कोणी व्हायरल केले हे समोर येणार आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3ztIVDI