Type Here to Get Search Results !

'त्या' माऊलीला हुंदका आवरत नव्हता; हात जोडत मुख्यमंत्री म्हणाले...

चिपळूण: 'आपण सुरक्षित आहात ना. काही इजा झाली नाही ना, तुमच्या मालाच्या नुकसानीचं बघू, ते आमच्यावर सोडा", अशा शब्दांत मुख्यमंत्री यांनी चिपळूणमधील व्यापाऱ्यांना व नागरिकांना दिलासा दिला आहे. यावेळी अनेक व्यापाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर व्यथा मांडल्या. शेतकऱ्यांप्रमाणे आम्हाला यावेळी कर्ज माफी दया. तुम्हीच आमचे माय बाप आहात आम्हाला जगवा. आम्ही पुन्हा कधी मागणार नाही, अशा रडवेल्या शब्दांत व्यापऱ्यांनी आपल्या व्यथा मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या. ही सगळी सारी परिस्थिती व आर्त व्यथा ऐकून मुख्यमंत्रीही गहिवरले. ( ) वाचा: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दुपारी १ वाजता येथील मुख्य बाजारपेठेत पोहोचले. परिवहन मंत्री , मंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार भास्कर जाधव, मिलिंद नार्वेकर आणि मुख्य सचिव सीताराम कुंटे त्यांच्यासोबत होते. एका महिलेने मुख्यमंत्र्यांसमोर टाहो फोडला. "आम्हाला आश्वासन नको, मदत हवी आहे. आम्हाला सोडून जाऊ नका, आम्हाला मदत करा", अशी विनवणी या महिलेने केली. ही महिला धायमोकलून रडत होती. माझ्या घराच्या छतापर्यंत पाणी गेलं. होतं नव्हतं सर्व गेलं. तुम्ही काहीही करा पण आम्हाला मदत करा. साहेब, तुम्हीच मदत करू शकता. मदत केल्याशिवाय जाऊ नका हो', असं ही महिला मोठमोठ्याने रडत सांगत होती. मुख्यमंत्र्यांनीही थांबून या महिलेसमोर हात जोडत तिला मदत करण्याचं आश्वासन दिलं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी गांधी चौकातील दुकानदारांशी संवाद साधला. त्यांच्याकडून परिस्थितीची माहिती जाणून घेतली. मुख्यमंत्र्यांनी दोन ठिकाणी थांबून व्यापाऱ्यांशी चर्चा केली व सर्वांना धीर दिला. मुख्यमंत्री येणार म्हणून बाजारपेठेत प्रचंड गर्दी झाली होती. गर्दीवर नियंत्रण मिळवताना पोलिसांची काहीशी दमछाक झाली. वाचा: यावेळी काही व्यापाऱ्यांनी आमचं सर्व नुकसान झालं. आमचा माल भिजला. होतं नव्हतं सर्व गेलं, असं गाऱ्हाणं मांडलं. त्यावर तुम्ही याची काळजी करू नका. तुम्हाला इजा झाली नाही ना. तुम्ही सर्व सुरक्षित आहात ना. तुमच्या मालाचं बघू, इन्शुरन्स कंपन्यानाही सांगू काळजी करू नका आम्ही आहोत अशी ग्वाही देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूरग्रस्तांना धीर दिला. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3zsG6CS

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.