उद्धव गोडसे । सांगलीमागील दोन दिवसांपासून कोकण व पश्चिम महाराष्ट्रात बरसणाऱ्या मुसळधार पावसामुळं जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. रेल्वे व रस्ते वाहतुकीची दाणादाण उडाली आहे. अनेक रेल्वे गाड्या ठिकठिकाणच्या स्थानकांमध्येच अडकल्या आहेत. या पार्श्वभूमीवर महालक्ष्मी, कोयना, हुबळी या तीन एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर कोकण रेल्वेमार्गे धावणार्या सहा एक्स्प्रेस गाड्या पुणे, सांगली आणि मिरज मार्गे वळविण्यात आल्या आहेत. वाचा: महाराष्ट्रात सर्वत्र मुसळधार पाऊस होत आहे. मुंबईत देखील मुसळधार पाऊस झाल्याने मुंबईतून सुटणार्या बहुतांश एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. बुधवारी रात्री कोल्हापूरहून सुटलेली रात्री पुण्यातच थांबविण्यात आली. तेथून पुढे ती रद्द करण्यात आली. तर गुरुवारी मुंबईतून सुटणारी महालक्ष्मी एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. कोयना एक्स्प्रेसची जाणारी आणि येणारी अशा दोन्ही फेर्या रद्द करण्यात आल्या. बुधवारी सुटलेली हुबळी-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस पुण्यात थांबविण्यात आली. तर गुरुवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटणारी रद्द करण्यात आली आहे. दादर येथून सुटणारी म्हैसूर एक्स्प्रेस पुण्यातून सोडण्यात येणार आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2V7La0N