Type Here to Get Search Results !

फडणवीसांचा 'तो' फोटो ट्वीट करत चित्रा वाघ यांचा ठाकरे सरकारवर निशाणा

मुंबईः विधानसभेतील विरोधी पक्षनेते (devendra fadnavis)आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (pravin darekar)यांनी बुधवारी आंबेघरमधील विस्थापित गावकऱ्यांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केलं. यावेळी फडणवीस आणि दरेकरांनी गावकऱ्यांसोबत जेवणही केलं. फडणवीस आणि दरेकरांचे हे फोटो सध्या व्हायरल होत आहेत. यावरुन भाजपच्या नेत्या () यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. आंबेघरमधील गावकऱ्यांचे तात्पुरते स्थलांतर केलेल्या मोरगिरीतील मोरणा विद्यालय आणि धावडे येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये फडणवीस आणि दरेकर पोहोचले. यावेळी कुटुंबांनी फडणवीस यांच्यासमोर दु:ख मांडले. सकाळपासून या छावणीतील रहिवासी उपाशी होते. फडणवीस यांनी या मंडळींना मानसिक आधार दिला. तसंच, ते स्वतः त्यांच्याबरोबर जेवले. यावरुन चित्रा वाघ यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या साधेपाणाचे कौतुक केलं आहे. वाचाः चित्रा वाघ यांनी ट्वीट करत फडणवीसांचे कौतुक केलं आहे तर ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. 'एकीकडे महापुरात उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबाची जाहीर मुस्कटदाबी अन् दुसरीकडे मांडीला मांडी लावून दोन घास घेत सावरण्यासाठीचं बळ आणि सोबत असल्याचा विश्वास. खरंच चित्रं खूप बोलकी असतात,' असं ट्वीट चित्रा वाघ यांनी केलं आहे. वाचाः वाचाः


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3zOFpEm

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.