Type Here to Get Search Results !

सक्रिय रुग्णसंख्या १२ हजारांवरून ४५३वर!; 'या' जिल्ह्याने करोनाची साखळी तोडली

जळगाव: जिल्ह्यात संसर्गाची साखळी खंडित करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विविध उपाययोजना राबविल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढले आहेत. सद्य:स्थितीत जिल्ह्यातील सक्रिय रुग्णसंख्या ४५३ पर्यंत खाली आली आहे. भविष्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी जिल्हावासियांनी नियमांचे तंतोतंत पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे. ( ) वाचा: करोनाच्या दुसऱ्या लाटेत जळगाव जिल्ह्यात सक्रिय रुग्णसंख्या १२ हजाराच्या जवळपास पोहचली होती. मात्र करोनाची साखळी खंडित करण्यासाठी प्रशासनाने राज्य शासनाच्या ब्रेक द चेन अतंर्गत मार्गदर्शक सूचनांनुसार प्रभावी उपाययोजना राबवून करोनाचा संसर्ग रोखण्यात यश मिळविले आहे. प्रशासनाने राबविलेल्या विविध उपाययोजनांमुळे जिल्ह्यात करोनाच्या दुसऱ्या लाटेत १२ हजारांपर्यंत गेलेली सक्रिय रुग्णसंख्या झपाट्याने कमी होत ती आता ४५३ पर्यंत खाली आली आहे. जिल्ह्यातील बारा तालुक्यांमध्ये सक्रिय रुग्णसंख्या ३०च्या आत आली आहे. जळगाव शहरातील रुग्णसंख्या ४९, ३९, जामनेर ३५ तर तालुक्यातील रुग्णसंख्या ८२ इतकी आहे. वाचा: करोनाच्या दुसऱ्या लाटेत जिल्ह्यातील जळगाव शहर, भुसावळ, चोपडा या तीन ठिकाणी सक्रिय रुग्णसंख्या हजाराच्यावर गेली होती तर उर्वरित तालुक्यात सक्रिय रुग्णसंख्या पाचशे ते हजाराच्या जवळपास पोहचली होती. मात्र, सध्या जिल्ह्यातील पंधरा तालुक्यांपैकी चौदा तालुक्यांत सक्रिय रुग्णसंख्या ही पन्नासच्या आत आली आहे. एकमेव चाळीसगाव तालुक्यात ही रुग्णसंख्या ८२ इतकी आहे. जिल्ह्यात सध्या ४५३ रुग्ण उपचार घेत आहेत. यापैकी २७२ रुग्ण लक्षणे असलेले तर १८१ रुग्ण हे लक्षणे नसलेले आहेत. सध्या जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.८७ टक्क्यांपर्यंत पोहचले आहे. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3AqIgo5

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.