Type Here to Get Search Results !

स्वप्निल लोणकर आत्महत्या प्रकरण; फडणवीसांची राज्य सरकारला 'ही' विनंती

मुंबईः महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्यामुळं आणि आर्थिक परिस्थितीमुळं तरुणानं आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या तरुणाच्या आत्महत्येमुळं हळहळ व्यक्त करण्यात येत असताना भाजप नेते व राज्याचे विरोधी पक्षनेते यांनी संताप व्यक्त केला आहे. आम्ही एमपीएससीला स्वायत्तता दिली आहे, पण स्वायत्तता म्हणजे स्वैराचार नाही, अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस प्रतिक्रिया दिली आहे. स्वप्नील सुनील लोणकर असं आत्महत्या करणाऱ्या तरुणाचं नाव आहे. स्वप्नील शिक्षण पूर्ण झाल्यापासून 'एमपीएससी'च्या परीक्षेची तयारी करत होता. स्वप्नीलच्या आत्महत्येनं त्याच्या आई-वडिलांना मानसिक धक्का बसला आहे. स्वप्निलच्या आत्महत्येनंतर राजकीय क्षेत्रातूनही प्रतिक्रिया समोर येत आहेत. देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणी प्रतिक्रिया देत राज्य सरकारला एक विनंती केली आहे. एमपीएससची जी कार्यप्रणाली आहे त्याचं पुनरावलोकन होण्याची आवश्यकता आहे, असं फडणवीस म्हणाले आहेत. वाचाः 'ज्या प्रकारे एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या मुलाखती होत नाहीत. तिथल्या अनेक जागा रिक्त आहेत. एमपीएससीचे मेंबर्स आपण भरलेले नाहीत. हे योग्य नाही. अत्यंत अपेक्षेने ही तरुण मुलं अशाप्रकारच्या परीक्षा देतात आणि दोन दोन वर्ष मुलाखत होत नाही. तर, मग त्यांना ही निराशा येते,' असं मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे. 'एमपीएससीला आम्ही स्वायत्तता दिलेली आहे. पण स्वायत्तता म्हणजे स्वैराचार नाही. त्यामुळं सरकारला देखील आमची विनंती आहे. की एमपीएससीच्या संपूर्ण कारभाराचा पुन्हा आढावा घेऊन, कशाप्रकारे यामध्ये संपूर्ण परिवर्तन करून, याला अधिक आपल्याला कार्यक्षम करता येईल याचा प्रयत्न सरकारने केला पाहिजे,' असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. वाचाः स्वप्नीलसोबत नेमकं काय घडलं? स्वप्नील एमपीएससीच्या २०१९ मध्ये झालेल्या पूर्व व मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झाला होता. मात्र त्याची मुलाखत दीड वर्षांपासून झालेली नव्हती. त्याचबरोबर त्याने २०२० मध्येही एमपीएससीची परीक्षा दिली. त्यामध्ये पूर्व परीक्षा तो उत्तीर्ण झाला. करोनामुळे मुख्य परीक्षा झालेली नाही. या सगळ्या तणावातूनच त्याने आत्महत्या केल्याचे मृत्यूपूर्वी चिठ्ठीत लिहून ठेवले आहे. याप्रकरणी लोणीकाळभोर पोलिस अधिक तपास करत आहेत.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2TzRkpN

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.