Type Here to Get Search Results !

चिपळूणमध्ये बचावकार्याला वेग; आठ बोटी उतरल्या पुराच्या पाण्यात

चिपळूण: रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण शहराला () पुरानं वेढा दिला असून पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांची सुटका करण्याचं काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आलं आहे. चिपळूण खेर्डी येथे २० जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं आहे. एनडीआरएफची () चार पथके रत्नागिरी जिल्ह्यात पोहोचली असून त्यातील दोन पथकांनी चिपळूणमध्ये मदत व बचावकार्य सुरू केलं आहे. दापोली तालुक्यातील हर्णे व दाभोळ येथूनही होडी आणि बोटी घेऊन पट्टीचे पोहणारे पथक चिपळूण येथे दाखल झाले आहे. मदतकार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. रत्नागिरीतील जाणीव फाऊंडेशनची टीम सुद्धा चिपळूणला पोहोचली आहे. रत्नागिरीतून 'हेल्पिंग हँड'चे कार्यकर्तेही पोहोचले आहेत. मालवण येथील आपत्कालीन ग्रुपचे २२ जणांचे पथक तीन इंजिन बोटींसह मुंबई-गोवा मार्गे लवकरच दाखल होत आहे. अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी वायरलेसद्वारे दिलेल्या माहितीनुसार, सध्या चिपळूणमध्ये १५ बोटी उपलब्ध असून त्यापैकी ८ बोटींमार्फत बचावकार्य सुरू आहे. वाचा: चिपळूण परिसरातील संपर्क यंत्रणा पूर्णपणे कोलमडली आहे. वीजपुरवठा खंडित असून मोबाइलही बंद आहेत. त्यामुळं मदतकार्यात अडथळे येत आहेत. सध्या संदेशवहन केवळ पोलीस वायरलेसच्या माध्यमातून सुरू आहे. मदतीसाठी काही हेल्पलाइन क्रमांक जारी करण्यात आले आहेत. हेल्पलाइन क्रमांक: नंदू चव्हाण: ८३२९३ ३७३३९ कौस्तुभ सावंत : ९८२२९ ८८०८० महेश गर्दे : ९४२२० ०३१२८ सचिन शिंदे : ८००७८ ४११११ खेड शहरातील पूरस्थिती नियंत्रणात, पण अॅलर्ट कायम दिलासादायक बाब म्हणजे, खेड शहरातील पूरस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती आहे. येथील पाणी ओसरत असून गांधी चौक येथे पाणीपातळी चार फुटांनी कमी झाली आहे. मात्र, पिंपळवाडी धरणातून विसर्ग सुरू करण्यात आल्यामुळं अॅलर्ट कायम आहे, अशी माहिती खेडचे प्रांताधिकारी अविशकुमार सोनोणे यांनी दिली आहे. चिपळूण गोवळकोट रोड येथील पाणी पातळी तीन फुटांनी कमी झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3xZ4eN6

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.