मुंबईः मुंबईत सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळं गोवंडीत इमारतीचा भाग कोसळल्यानं मोठी दुर्घटना घडली आहे. शुक्रवारी पहाटे ४. ५८ वाजता इमारतीचा भाग कोसळला आहे. या दुर्घटनेत ३ जणांचा मृत्यू झाला असून सात जण गंभीर जखमी आहेत. गोवंडीतील शिवाजीनगर येथील बॉम्बे रुग्णालयाजवळ ही इमारत होती. तळमजला अधिक एक मजला असलेल्या इमारतीचा भाग कोसळल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली सापडलेल्या ३ जणांचा जागीच मृत्यू झाला असून ७ जणांना ढिगाऱ्याखालून वाचवण्यात यश आलं आहे. या ७ जणांना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. वाचाः या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. फैजल कुरेशी (वय २१), नमरा कुरेशी (वय- १७), शाहिना कुरेशी ( वय- २६) अशी मृतांची नावं आहेत. वाचाः दरम्यान, राज्यभरात पावसानं हाहाकार माजवला आहे. चिपळूण, खेडमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. तर, रायगड, महाडमध्ये दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. रायगडमध्ये दरड कोसळून चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर, ५ जण ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. वाचाः
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3rs5VQV