Type Here to Get Search Results !

नाशिकमध्ये मनसेचा स्वबळाचा नारा; अमित ठाकरे करणार नेतृत्व

नाशिकः मुंबई, पुणे, नाशिकसह मोठ्या शहरातील आगामी निवडणुकांसाठी राजकीय पक्षांनी आत्तापासून मोर्चेबांधणी सुरु केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष हे पुण्याच्या दौऱ्यावर आहेत तर, त्यांचे सुपुत्र व मनसे नेते हे नाशिक दौऱ्यावर आहेत. नाशिक महापालिकेची जबाबदारी अमित ठाकरेंवर देण्याची शक्यता असतानाच मनसे नेते यांनी मोठं विधान केलं आहे. अमित ठाकरे हे आजपासून दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांच्यासोबत मनसे नेते संदीप देशपांडेसोबत आहेत. प्रसारमाध्यमांसोबत बोलताना देशपांडे यांनी अमित ठाकरेंच्या नेतृत्वाखाली मनसे नाशिकमध्ये कमबॅक करेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. गेल्या पाच वर्षात नाशिककरांची पुरती निराशा झाली आहे, दत्तक घेऊ योजनाही फसली आहे, असा टोलाही यावेळी देशपांडे यांनी लगावला आहे. मनसे स्वबळावर आगामी महापालिकेच्या निवडणुकात मनसे स्वबळावरच लढणार आहे. सध्या तरी आमच्याकडे कोणाकडूनही युतीचा प्रस्ताव आलेला नाही, असं संदीप देशपांडे यांनी स्पष्ट केलं आहे. तसंच, नाशिकचं संगोपन राज ठाकरेंनी मनापासून केलं आहे. आगामी निवडणुकीत जुन्या- नव्या कार्यकर्त्यांचा संगम करु, असंही त्यांनी म्हटलं आहे. वाचाः कोकणवासियांसाठी मदत केंद्र सरकारने पूरग्रस्तांसाठी पॅकेज तर जाहीर केलं तरी मदत पोहोचत नाही. मनसेनं १०० ते सव्वाशे ट्रक मदत पाठवली आहे. असं सांगतानाच त्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. शिवसेनेनं मदत करण्याआधीच जाहिरात केली आहे. प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा कोकणाला फटका बसला आहे. आपल्याकडे एसओपी नाही, हे प्रशासनाचं अपयश आहे. प्रशासन कोणत्याही प्रकारचे धोक्याचे इशारे लोकांना देत नाही, अशा शब्दांत संदीप देशपांडे यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. वाचाः हा पैसे खाण्याचा नवा मार्ग पूरस्थिती टाळण्यासाठी किनाऱ्यांवर संरक्षण भिंत बांधण्याचा निर्णयाचा सरकार विचार करत असल्याची चर्चा आहे. यावर नद्यांवर भिंत म्हणजे पैसे खाण्याचा नवा मार्ग आहे, असा टोला संदीप देशपांडे यांनी लगावला आहे. समुद्रात बांधला जाणारा, शिवाजी महाराजांचा पुतळा कुठे गेला?, असा सवाल त्यांनी केला आहे. तसंच, गड किल्ले संवर्धन महत्वाचं हे यांनी सांगितलं होतं, याकडेही त्यांनी लक्ष वेधलं आहे. वाचाः


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3f7gFz1

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.