Type Here to Get Search Results !

कोल्हापूर : कृषी विद्यापीठाचं उद्घाटन; शरद पवारांनी सुरुवातीलाच दिल्या 'या' सूचना

: कोल्हापूर जिल्ह्यातील तळसंदे येथील डी. वाय. पाटील. कृषी व तंत्र विद्यापीठाचे गुरुवारी माजी केंद्रीय कृषीमंत्री आणि खासदार यांच्या हस्ते झालेल्या कार्यक्रमात व्हर्च्युअल उद्घाटन झाले. या उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी डी. वाय. पाटील ग्रुपचे संस्थापक व माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील हे होते. शरद पवारांनी या कृषी विद्यापीठाचं उद्घाटन करत असतानाच भविष्यातील वाटचाल कशी असावी, याबाबतच्या सूचना दिल्या आहेत. नक्की काय म्हणाले शरद पवार? 'देशातील ५८ टक्के लोक शेतीवर अवलंबून आहेत. शेतीचे अर्थकारण सुधारल्याशिवाय समाजातील शेवटच्या घटकाची उन्नती होणार नाही. जीन्समध्ये बदल करून तयार होणाऱ्या बियाण्यापासून अधिक उत्पादन मिळते, मात्र अशी जीएम बियाण्याबाबत युरोप आणि अमेरिकेत एका बाजूला विरोध करून चळवळी उभारतात आणि दुसऱ्या बाजूला हेच देश यातून भरमसाठ उत्पादन घेत आहेत. हा विरोधाभास लक्षात घेता, आपल्याही देशाने जे जे शक्य आहे ते सर्व संशोधन करावे, आणि जीएम सारख्या बियाण्यांचा वापर करून स्वयंपूर्ण होण्याची गरज आहे.देशात कृषी संशोधनासाठी ८० संस्था आणि पाच हजार शास्त्रज्ञ कार्यरत आहेत. त्यांच्या ज्ञानाचा उपयोग शेतकरी यांना व्हावा यासाठी कृषी विद्यापीठाने समन्वय साधत हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोचवण्यासाठी मध्यस्थाची भूमिका बजावावी,' अशा सूचना शरद पवार यांनी यावेळी दिल्या. पवार म्हणाले, पाणी, माती आणि अधिक उत्पादन यासाठी इस्रायली तंत्रज्ञान जगात अव्वल असले तरी फळ, भाज्या, फुले, दूध या उत्पादनात नेदरलँडला तोड नाही. विद्यापीठाने इजराइल सोबत करार केला आहे. नेदरलँड, चीन, बँकॉक आदि कृषी क्षेत्रात अव्वल असणाऱ्या विद्यापीठांची संलग्न व्यवहार करावेत. त्यासाठी आपण मदत करू. राज्याच्या उभारणीत आणि प्रगतीमध्ये चार कृषी विद्यापीठांचे मोठे योगदान आहे. यापुढे डी वाय पाटील नवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने वेगळा ठसा उमटवेल. शेती तंत्रज्ञान अधिक प्रगत होण्यासाठी हे विद्यापीठ हातभार लावणारे ठरेल याबाबत मला शंका नाही. 'शेतीचे अर्थकारण सुधारल्याशिवाय समाजातील शेवटच्या घटकाची उन्नती होणार नाही, पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवून त्याचा योग्य वापर, माती जतन आणि संवर्धन याचबरोबर नवनवीन बी-बियाणे आणि खतांचे संशोधन या त्रिसूत्रीचा वापर केल्यास कृषी उत्पादनात मोठी झेप घेता येईल,' असा विश्वासही शरद पवार यांनी व्यक्त केला.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3hcoKEe

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.