Type Here to Get Search Results !

सुप्रिया सुळे यांची 'ती' सूचना; धनंजय मुंडे यांनी लगेच घेतला निर्णय

मुंबई: राज्यातील लसीकरणासाठी पात्र असलेल्या सर्व व्यक्तींचे प्राधान्याने करण्यात यावे. त्यासाठी राज्यभरात विशेष मोहीम राबविण्यात यावी, असे आदेश आज दिव्यांग कल्याण आयुक्तालयामार्फत जारी करण्यात आले आहेत. सामाजिक न्याय विभाग व सार्वजनिक आरोग्य विभाग मिळून ही मोहीम राबवणार असल्याची माहिती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री यांनी दिली आहे. खासदार यांनी याबाबत पत्राद्वारे मुंडे यांना सूचना केली होती. त्यावर तातडीने कार्यवाही करण्यात आली. ( ) वाचा: सामाजिक न्याय विभाग व आरोग्य विभागाने याबाबतचा शासन निर्णय जारी केला होता. त्यानंतर आरोग्यमंत्री यांनी देखील तातडीने सकारात्मक पावले उचलत आवश्यक निर्णय घेऊन आरोग्य विभागामार्फत परिपत्रक व मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. ही लसीकरण मोहीम व्यापक स्वरूपात संपूर्ण राज्यात राबवता यावी, याद्वारे प्रत्येक पात्र दिव्यांग व्यक्तीपर्यंत त्याची माहिती प्रसारित व्हावी, तसेच विनाव्यत्यय व कोविड विषयक संसर्गाचा धोका टाळून ही मोहीम यशस्वीरित्या राबविण्यात यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. याबाबतचा कृती आराखडा व मार्गदर्शक सूचना संबंधित दोनही विभागांकडून सर्व जिल्ह्यांना पाठविण्यात आल्या आहेत. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी स्थानिक प्रशासन, समाज कल्याण विभाग, आरोग्य विभाग यांनी समन्वयन करावयाचे आहे, असेही नमूद करण्यात आले आहे. वाचा: असा असेल कृती कार्यक्रम - प्रत्त्येक महानगरपालिका, जिल्हा परिषद यांच्या माध्यमातून आठवड्यातील एक दिवस दिव्यांग व्यक्तींच्या लसीकरणासाठी राखीव ठेवण्यात येईल किंवा शक्य असेल तिथे स्वतंत्र लसीकरण केंद्र, मोबाइल व्हॅन उपलब्ध करून देण्यात येईल. - लसीकरण करण्याची तारीख व वार महानगरपालिका, जिल्हा परिषद, समाज कल्याण विभाग तसेच दिव्यांग व्यक्तींच्या कल्याणासाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था यांच्यामार्फत व्यापक प्रसिद्धी देऊन त्याची माहिती दिव्यांग व्यक्तींपर्यंत पोचविण्यात यावी. - कर्णबधीर दिव्यांग व्यक्तींसाठी सांकेतिक भाषेत व्हिडिओ तयार करण्यात यावेत, तसेच अंध दिव्यांग व्यक्तींसाठी माहिती देणाऱ्या ऑडिओ क्लिप्स तयार करण्यात याव्यात. गावोगावी दिव्यांग व्यक्तींची संख्या निश्चित करण्यात यावी, यासाठी समाज कल्याण विभागाच्या शाळांमधील शिक्षक, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका यांची मदत घेण्यात यावी. दर्शनी भागात याबाबतचे पोस्टर्स वा फ्लेक्स लावण्यात यावेत. वाचा: आरोग्य विभागाने काढले परिपत्रक सामाजिक न्याय विभागाच्या कृती आराखड्यास व मार्गदर्शक सुचनांना अनुसरून सार्वजनिक आरोग्य विभागाने दिव्यांग व्यक्तींचे प्राधान्याने लसीकरण करण्यासंबंधीचे परिपत्रक जारी केले असून, सदर लसीकरण मोहिमेच्या कृती आराखड्यानुसार दिव्यांग व्यक्तींचे प्राधान्याने लसीकरण करण्याबाबतचे आदेश जारी केले आहेत. सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या निर्देशानुसार काही दिवसांपूर्वीच दिव्यांग व्यक्तींच्या विशेष लसीकरण मोहिमेबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला होता, त्यानुसार विभागाने अवघ्या काही दिवसातच कृती कार्यक्रम तयार केला असुन, दिव्यांग व्यक्तींना राज्यभरात आता प्राधान्याने लस मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. प्रत्येक जिल्हा प्रशासन, समाज कल्याण विभाग, आरोग्य विभाग तसेच अन्य सर्व संबंधित यंत्रणांनी मिळून या मोहिमेला यशस्वी करण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन धनंजय मुंडे यांनी केले आहे. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/36hjFnR

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.