Type Here to Get Search Results !

आम्ही मुख्यमंत्र्यांशिवाय कोणालाही भेटणार नाही; वंचितची ठाम भूमिका

मुंबई: आम्हाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच भेटावे आणि आमच्या मागण्या मंजूर कराव्यात, मुख्यमंत्र्यांशिवाय आम्ही इतर कोणत्याही मंत्र्यांना भेटू इच्छित नाही, अशी भूमिका घेत वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाने अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांची भेट नाकारली. ५ टक्के लागू करावे आणि धार्मिक प्रतीकांचा गैरवापर करून दंगली घडवणाऱ्या विरुद्ध प्रस्तावित कायदा लागू करावा या मागणीसाठी आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने विधानभवनावर मोर्चा काढण्यात आला होता. पोलिसांनी वंचितच्या कार्यकर्त्यांना मोर्चात सहभागी होण्यापासून रोखले. त्यानंतर आंदोलक कार्यकर्त्यांची धरपकड केली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या भेटीचे आश्वासन देत विधानभवनात नेले. मात्र तिथे मुख्यमंत्र्यांऐवजी त्यांची भेट मलिक यांच्याशी घडवण्यात आली. (the has taken a firm stand that we will not meet anyone except the chief minister) विधान भवनात गेललेले वंचितचे नेते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करण्यावर ठाम होते. मुख्यमंत्र्यांच्या भेटीचे आश्वासन देऊन पोलिसांनी शिष्टमंडळ विधानभवन परिसरात नेले. मात्र तिथे अल्पसंख्याक मंत्री नावाब मलिक हे शिष्ठमंडळाला भेटण्यासाठी आले असता शिष्ठमंडळातील वंचित बहुजन महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर आणि प्रदेश प्रवक्ता फारुख अहमद यांनी अधिकारशून्य अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्याशी चर्चेस स्पष्ट नकार दिला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः भेटीसाठी वेळ द्यावी आणि मागण्या मंजूर कराव्यात अशी भूमिका वंचित बहुजन आघाडीने घेतली आहे. क्लिक करा आणि वाचा- मराठा आरक्षण आणि ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा धगधगत असताना आता मुस्लिमांच्या आरक्षणाचा मुद्दाही चर्चेत आला आहे. मुस्लिमांना ५ टक्के आरक्षण दयावे, या मागणीसाठी आणि रझा अकादमीने आज ५ जुलैला विधानभवनावर भव्य मोर्चा काढला आहे. क्लिक करा आणि वाचा- सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द करण्याचा निर्णय दिला आहे. मात्र मुस्लिमांबाबत कोर्टाने कोणताही तसा निकाल दिलेला नाही. असे असतानाही धर्मनिरपेक्ष म्हणवून घेणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेसने अजूनही मुस्लिम समाजाला आरक्षण दिलेले नाही. म्हणूनच, मुस्लिमांना आरक्षण द्यावे या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी आणि रजा अकादमीने विधानसभवनावर सरकारविरोधात मोर्चा काढला. क्लिक करा आणि वाचा-


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2UrMPhm

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.