Type Here to Get Search Results !

टिटवाळ्यात गजा मारणे प्रकरणाची पुनरावृत्ती; आरोपीची जंगी मिरवणूक

कल्याण: तुरुंगातून जामिनावर सुटलेल्या गुन्हेगारी जंगी मिरवणूक काढण्याचा प्रकार जवळच्या बोरगावात घडला आहे. या मिरवणुकीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या प्रकरणी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ( at , ) गुन्ह्यात शिक्षा भोगून जेलमधून बाहेर आलेल्या आरोपीची जल्लोषात मिरवणूक काढण्याचे प्रकार वाढू लागले आहेत. त्या माध्यमातून लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. दोन महिन्यांपूर्वी पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणे याची जामिनावर सुटका होताच त्याची फटाक्याच्या आतषबाजीत जंगी मिरवणूक काढण्यात आली होती. त्या प्रकरणी १०० हून अधिक जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. मुंबई उच्च न्यायालयानंही या प्रकाराची गंभीर दखल घेतली होती. असं असतानाही पुन्हा तसाच प्रकार समोर आला आहे. वाचा: टिटवाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वरप बोरगावातील गणेश म्हसकर, महेश पाल हे दोघे अट्टल गुन्हेगार असून मोका अंतर्गत त्याच्यावर कारवाई झाली होती. यामधील महेश पाल याची काही महिन्यांपूर्वी जामिनावर सुटका करण्यात आली होती. तर, गणेश म्हसकरची गुरुवारी जामिनावर सुटका झाली. त्यानंतर या दोघांच्या समर्थकांनी त्यांची गावातून जंगी मिरवणूक काढली. कल्याण नजीकच्या बोरगावात काढण्यात आलेल्या या मिरवणुकीचा व्हिडिओ सोशल मीडियावर काही वेळातच मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. टिटवाळा पोलिसांनी याची गंभीर दखल घेत दोन्ही आरोपींसह इतर काही जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. करोनाच्या काळात मिरवणूक काढल्याबद्दल सुद्धा त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे. वाचा: वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3he0jpV

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.