Type Here to Get Search Results !

भयंकर! जनरेटरमधील वायू गळतीमुळे एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

म. टा. वृत्तसेवा । येथे जनरेटरमधील कार्बन डाय ऑक्साइड वायूच्या गळतीमुळे एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मृतांमध्ये आठ वर्षांच्या मुलासह एका १४ वर्षीय मुलीचाही समावेश आहे. (Seven Dies due to ) चंद्रपूरमधील दूर्गापुर येथील कंत्राटदार रमेश लष्कर यांच्या घरी हा अपघात घडला. आज पहाटे संपूर्ण प्रकार उघडकीस आला. लष्कर यांच्या घरात असलेल्या जनरेटरमधील कार्बन डाय ऑक्साइड वायूची अचानक गळती सुरू झाली. हा प्रकार घडला तेव्हा संपूर्ण कुटुंब झोपेत होते. वायूमुळे काही वेळातच गुदमरले जाऊन सातही जण बेशुद्ध पडले. सकाळी उशिरापर्यंत लष्कर कुटुंबातील सदस्य घराबाहेर न आल्याने आजूबाजूच्या लोकांनी दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला. त्यांनी लष्कर कुटुंबातील सातही जणांना बेशुद्धावस्थेत खासगी रुग्णालयामध्ये दाखल केले. मात्र, तिथे सहा जणांना मृत घोषित करण्यात आले, तर लष्कर कुटुंबातील एका महिलेवर उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान तिचाही मृत्यू झाला आहे. वाचा: मृतांमध्ये अजय लष्कर (२१), रमेश लष्कर (४५), लखन लष्कर (१०), कृष्णा लष्कर (८), पूजा लष्कर (१४), माधुरी लष्कर (२०) यांचा समावेश आहे. दहा दिवसांपूर्वीच या कुटुंबात विवाह झाला होता. नववधु व मुलांचाही मृतात समावेश आहे. या घटनेमुळं संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3kdiCNW

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.