Type Here to Get Search Results !

परभणी शहरात ढगफुटी सदृश्य पाऊस; रत्नागिरीतही मुसळधार

मुंबईः जून महिन्यात पावसानं दडी मारल्यानंतर गेल्या चार दिवसांपासून पाऊस पुन्हा सक्रीय झाला आहे. मुंबईसह कोकण व मध्य महाराष्ट्रात तुफान पाऊस सुरू आहे. आजसाठी रत्नागिरी जिल्ह्यात रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर, मुंबईसह, पालघर, ठाणे, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात गुरुवारपर्यंत ऑरेंज अलर्ट देण्यात आला आ रविवारपासून सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात पावसानं धुमाकुळ घातला आहे. मुसळधार पावसामुळं राजापुर शहरातील अर्जुना आणि कोदावली नदीला पूर आला आहे. तर, अमरावती, नांदेड जिल्ह्यातही पावसानं दाणादाण उडवली आहे. - परभणी शहरात रविवारी ढगफुटी सदृश्य पाऊस; जायकवाडीचा कालवा फुटल्यानं अनेक घरात पाणी - राजापूर येथे आलेल्या पूरात एक व्यक्ती वाहून गेल्याची प्राथमिक माहिती - रत्नागिरीः अर्जुना नदीच्या पाण्याची पातळी वाढल्यास मुंबई- गोवा महामार्ग अवजड वाहतूकीसाठी बंद करण्याचा इशारा - राजापूर तालुक्यात कालपासून जोरदार पाऊस, शहरात पूर परिस्थिती - नांदेड जिल्ह्यात रविवारी मुसळधार पाऊस, अनेक भागांत तीन- चार फुट पाणी साचले - चंद्रभागा नदीला पूर; बाबळी ते बनोसा या गावांना जोडणाऱ्या पुलावर नदीचे पाणी


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3wudQOh

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.