Type Here to Get Search Results !

उद्धव ठाकरेंपेक्षा राहुल गांधी बरे; भाजपची खोचक टीका

मुंबई: विधिमंडळाच्या दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे. प्रत्यक्ष कामकाज सुरू होण्यापूर्वीच विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सरकारला घेरण्यास सुरुवात केली आहे. प्रत्येक मुद्द्यावरून भाजपचे नेते महाविकास आघाडी व मुख्यमंत्री यांच्यावर तोफा डागत आहेत. अधिवेशनाआधी पत्रकारांना संबोधित न केल्याबद्दलही भाजपनं मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. (BJP MLA Compares with ) भाजपचे आमदार यांनी या संदर्भात ट्वीट करत उद्धव ठाकरेंची तुलना काँग्रेस नेते यांच्याशी केली आहे. 'मुख्यमंत्र्यांना विधिमंडळ अधिवेशनापूर्वी पत्रकारांना संबोधित करण्याचं धाडस झालेलं नाही. १७० आमदार पाठीशी असताना इतकेही बळ नसेल तर उपयोग काय? यांच्यापेक्षा राहुल गांधी बरे,' असं भातखळकर यांनी म्हटलं आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यापासून भाजपचे नेते या सरकारविरोधात विशेषत: शिवसेनेच्या विरोधात कमालीचे आक्रमक झाले आहेत. शिवसेनेवर टीका करण्याची एकही संधी भाजपचे नेते सोडत नाहीत. पावसाळी अधिवेशनाची घोषणा झाली तेव्हापासून भाजपनं पुन्हा सरकारला व शिवसेनेला घेरायला सुरुवात केली आहे. अधिवेशनाचा कालावधी वाढवावा व विधानसभा अध्यक्षांची निवड लवकरात लवकर केली जावी, या मागण्या भाजपनं लावून धरल्या आहेत. विरोधी पक्षनेते यांनी त्यासाठी थेट राज्यपालांची भेट घेतली होती. राज्यपालांनीही तत्परतेनं फडणवीसांच्या मागण्यांची दखल घेत मुख्यमंत्री ठाकरे यांना पत्र लिहिलं होतं व मागण्यांवर कार्यवाही करण्याची मागणी केली होती. अधिवेशनापूर्वी सरकारवर दबाव आणण्याची भाजपची ही रणनीती असल्याचं बोललं जात आहे. भातखळकर यांनी केलेली टीका याचाच एक भाग असल्याचं सांगितलं जातंय. आणखी वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2TAmldo

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.