Type Here to Get Search Results !

'शिवसेना आमदार चिमणराव पाटलांचा एक पाय भाजपात!'

जळगाव: पालकमंत्री यांचे काम राष्ट्रवादीला आक्षेपार्ह वाटत नसताना त्यांच्याच पक्षाचे आमदार यांना ते का आक्षेपार्ह वाटते? असा सवाल उपस्थित करीत आमदार पाटील यांचा एक पाय सध्या शिवसेनेत व एक पाय भाजपमध्ये असल्याचा दावा काँग्रेसचे माजी आमदार यांनी पत्रकार परिषदेत केला. ( ) वाचा: माजी महानगराध्यक्ष विनोद देशमुख यांचे निलंबन पक्षाने मागे घेतले असून त्यांना पक्षात घेण्यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, माजी आमदार मनीष जैन, राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, प्रदेश प्रवक्ता योगेश देसले, कार्याध्यक्ष विलास पाटील, जिल्हा बँक संचालक संजय पवार, महिला शहराध्यक्षा मंगला पाटील, प्रतिभा शिरसाठ आदी उपस्थित होते. वाचा: सन २०१४ च्या निवडणुकी आपला पराभव घडवून आणला, असे वक्तव्य आमदार चिमणराव पाटील यांनी केले आहे. त्याचे खंडन करणे गरजेचे असून वय ७० पेक्षा अधिक वाढल्याने चिमणरावांचे मानसिक संतुलनही अधिकच बिघडले आहे, अशी बोचरी टीका डॉ. सतिष पाटील यांनी केली. राष्ट्रवादीत कार्यकर्ते मोठे करण्याची मानसिकता आहे. मात्र, शिवसेनेत वेगळे चित्र दिसतेय, असे नमूद करत जिल्हा परिषदेतील सदस्य डॉ. हर्षल माने यांची शिवसेना जिल्हाप्रमुख म्हणून निवड झाल्यानंतर तुमची झोप का उडाली?, असा खोचक सवाल पाटील यांनी चिमणराव पाटील यांना उद्देशून केला. वाचा: विनोद देशमुख यांना ऑक्टोबर २०२० मध्ये पक्षाने निलंबित केले होते. त्यांच्याकडून काही चुका झाल्या मात्र, पक्षात अनेकांना प्रवेश देत असताना चुका सुधारण्याची संधी दिली गेली पाहिजे, त्यामुळे देशमुखांचे निलंबन मागे घेण्यासाठी आपण प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सुप्रिया सुळे यांच्याशी संपर्क केला, असे सतिष पाटील यांनी सांगितले. दरम्यान, शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक पाटील यांच्या अनुपस्थितीवरून त्यांना पत्रकार परिषदेचा निरोप मिळाला नसेल, त्यांनाही कामाची संधी आहे त्यांनी काम करावे, असे सतिष पाटील म्हणाले. शाई फेकल्या प्रकरणी माफी आंदोलनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फलकावरील फोटोवर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शाई फेकणे हे चुकीचे आहे. शेवटी पदाचा मान राखला पाहिजे. मात्र, लोकांना जेव्हा त्रास होतो, तेव्हा त्या त्रासातून काही गोष्टी घडत असतात, तरीही या प्रकाराची आम्ही माफी मागत असल्याचेही डॉ. सतिष पाटील यांनी सांगितले. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2TsWOTy

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.