Type Here to Get Search Results !

उस्मानाबाद तालुक्यात पुरात वाहून जाणाऱ्या दोघांना वाचवण्यात यश, दोघांचा शोध सुरू

औरंगाबाद: उस्मानाबाद तालुक्यात शुक्रवारी रात्री झालेल्या पावसामुळे नदी - नाले भरून वाहत आहेत. तालुक्यातील बोरगाव आणि समुद्रवाणी येथे प्रत्येकी एक असे दोन जण वाहून गेले. त्यांचा शोध घेण्याचे काम रात्रीपासून सुरू आहे. दोघांना वाचवण्यात यश आले आहे , अशी माहिती उस्मानाबादचे तहसीलदार गणेश माळी यांनी दिली. (rescued two while being swept away in the flood and two are still missing in ) उस्मानाबाद तालुक्यातील बोरगाव राजे - बोरखेडा रस्त्यावरील ओढ्यातून बोरखेडा येथील ओढ्यावरील पुलावरून जाताना समीर युन्नूस शेख ( वय २७ ) हे वाहून गेले. श्री. शेख हे मोटरसायकलवर होते. एका शेतकऱ्याने त्यांना पाण्यात जाण्यास मनाई करूनही वाहत्या पाण्यात गेल्यामुळे ते वाहून गेले. गावकऱ्यांच्या मदतीने त्याचा शोध घेण्याचे कार्य सुरू आहे. अद्याप त्यांचा शोध लागला नाही.पोलिस, महसूल , नगरपालिका आणि उस्मानाबाद फायर ब्रिगेडची टीम पाठवण्यात आली आहे. क्लिक करा आणि वाचा- समुद्रवाणी या गावातील पुलावरून एक इंडिका कार पाण्यात वाहून गेली. या कारमध्ये चौघे जण होते . त्यापैकी दोघे पाण्याचा अंदाज घेण्यासाठी उतरले होते तर दोघे कारमध्ये होते . वाहून जाणाऱ्या कारमधील मेंढा येथील गोवर्धन विष्णू ढोरमारे ( वय ५५) आणि बाबा विश्वनाथ कांबळे या दोघांना गावकऱ्यांच्या मदतीने सुरक्षित बाहेर काढण्यात आले . दरम्यान , समुद्रवाणी येथे पूर पाहण्यास गेलेला एक जण पुरात वाहून गेला . त्याचा शोध सुरू आहे, असेही तहसीलदार माळी यांनी सांगितले. क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3AO6uIY

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.