Type Here to Get Search Results !

हिंगोलीत वर्षा गायकवाड यांच्या कारला अपघात; भरधाव टेम्पोची धडक

हिंगोली: राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री आणि जिल्ह्याच्या पालकमंत्री या अपघातातून थोडक्यात बचावल्या आहेत. दोन दिवसांच्या हिंगोली दौऱ्यावर असलेल्या गायकवाड यांच्या कारला आज टेम्पोने धडक दिल्याने हा अपघात झाला. या अपघातात कारचं काही प्रमाणात नुकसान झालं असलं तरी वर्षा गायकवाड वा अन्य कुणाला कोणताही इजा झालेली नाही. त्या सुखरूप आहेत, असं सांगण्यात आलं. दरम्यान, टेम्पोचालकाला पोलिसांनी अटक केली आहे. ( ) हिंगोली शहरातील पीपल्स बँकेजवळ आज दुपारी १२.३० च्या सुमारास हा अपघात झाला. येथे उभारण्यात आलेल्या प्रकल्पाचे सकाळी उद्घाटन केल्यानंतर वर्षा गायकवाड या अन्य सहकाऱ्यांसह रामलीला मैदानाची पाहणी करण्यासाठी निघाल्या होत्या. दरम्यान, पीपल्स बॅकेजवळ एका भरधाव टेम्पोने त्यांच्या कारला मागील बाजूने धडक दिली. यात कारचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. सुदैवाने गायकवाड वा अन्य कुणालाही कोणती इजा झाली नाही. अपघातानंतर पोलिसांनी लगेचच टेम्पोचालकाला अटक केली असून याबाबत वर्षा गायकवाड यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. ही घटना घडल्यानंतरही गायकवाड यांचे नियोजित कार्यक्रम सुरू असून त्यांनी रामलीला मैदानाची पाहणी केली व त्याअनुषंगाने संबंधितांना सूचना केल्या. वाचा: दरम्यान, वर्षा गायकवाड दोन दिवसांच्या हिंगोली दौऱ्यावर आल्या आहेत. कालपासून त्या हिंगोलीत आहेत. संसर्गाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा लहान मुलांना अधिक धोका लक्षात घेत हिंगोली जिल्हा रुग्णालयात उभारण्यात आलेल्या ५० खाटांचे स्वतंत्र बालरुग्ण अतिदक्षता विभागाचे लोकार्पण त्यांच्याहस्ते झाले. हा विभाग जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीडीसी) फंडातून उभारण्यात आला आहे. बालरुग्ण व्यवस्थेसह रुग्णालयात एचआयव्ही/एड्सवरील उपचारासाठी जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष आणि अँटीरेट्रोव्हायरल थेरपी औषधोपचार केंद्राच्या नवीन इमारतीचे उद्धाटनही त्यांनी केले. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3hZGOk3

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.