Type Here to Get Search Results !

राज्यात अतिवृष्टीचा कहर! 'या' जिल्ह्यामध्ये ढगफुटीसदृश पाऊस, शहरं पाण्याखाली

परभणी : परभणी जिल्ह्यात काल सर्वदूर पावसाने खरिपाच्या पिकांना जीवदान मिळाले असून दुबार पेरणीचे संकट टळले आहे. जिल्ह्यात काल 232 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. काल झालेल्या पावसाने शहरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून ढगफुटी सदृश पाऊस पडला असल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, परभणीमध्ये मुसळधार पावसाने रेल्वे स्टेशनची रुळे पाण्याखाली गेली, रस्ते पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत. पावसाने अनेक दुकानात-घरात पाणी गेल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर जायकवाडीचा कालवा ओव्हरफ्लो झाल्याने फुटला व वांगी रोडवरील झोपडपट्टीमधील घरात-दुकानात पाणी गेल्याने जनजीवन विस्कळीत झाल्याची माहिती आहे. परभणी शहरात ढगफुटीजन्य परिस्थितीत निर्माण झाली असून काल दुपारी 2 वाजेपासून सुरू असलेल्या पाऊस अद्यापही सुरूच आहे. सततच्या संततधारमुळे अनेक रस्ते जलमय झाले आहेत. शहरातील मध्यवस्तीत असलेल्या बजारपेठेतील दुकानात गुढघ्याइतकं पाणी साचलं आहे. शहरात सायंकाळपर्यतच्या जोरदार पाऊसाने सखल भागातील वसाहती व झोपडपट्ट्यांत घराघरात मोठ्या प्रमाणावर पाणी घुसल्याने मोठा गोंधळ उडाला आहे. इतकंच नाहीतर शहरातील बहुतांशी रस्ते पुर्णतः जलमय झाल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. जिल्ह्यातील खरीप पिकांकरिता पाऊस गरजेचा होता. सर्वसामान्य शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसले होते. पाऊस सक्रीय झाला. त्यामुळेच सर्वसामान्य शेतकरी कमालीचा सुखावला. पावसाने शहरातील सखल भागातील गुजरी बाजार, गांधीपार्क, क्रांतीचौक, नारायण चाळ , अपना कॉर्नर, इकबाल नगर या भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं असून बहुतांशी झोपडपट्टी भागात घराघरातून पाणी शिरले. पावसाने शहरातील अनेक भागातील वीज पुरवठा खंडीत झाला आहे. तर दुसरीकडे सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील पाथरी तालुक्यातील मुदगल बंधारा पूर्ण क्षमतेने भरला असून कुठल्याही क्षणी पाणी सोडण्यात येणार असल्याचा इशारा जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3hSnSDy

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.