Type Here to Get Search Results !

आठ दिवसांपासून जळगावात 'कुछ होने वाला है'चे मेसेज फिरत होते: एकनाथ खडसे

मुंबईः 'गेल्या ८ दिवसांपासून जळगावमध्ये कुछ होने वाला है असा मेसेज फिरत होता. याचा अर्थ कार्यकर्त्यांना याची माहिती होती. राजकीय हेतूने हे सर्व सुरु असून मी याबाबतच्या चौकशीला सामोरे जाणार आहे,' असं राष्ट्रवादीचे नेते () यांनी म्हटलं आहे. ईडीच्या कार्यालयात जाताना त्यांनी प्रसारमाध्यमांसोबत संवाद साधला तेव्हा ते बोलत होते. पुण्यातील भोसरी जमीन घोटाळ्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना ईडीने समन्स बजावले आहेत. आज सकाळी ११ वाजता ईडीने खडसेंना चौकशीसाठी हजर राहण्याच्या सूचना दिल्या होत्या. यापूर्वी एकनाथ खडसे पत्रकार परिषद घेणार होते. मात्र, प्रकृती बिघडल्यानं खडसेंची पत्रकार परिषद रद्द करण्यात आली होती. त्यामुळं ते चौकशीसाठी हजर राहणार का?, याबाबत शंका असतानाच खडसे चौकशसाठी ईडी कार्यालयात हजर राहिले आहेत. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. वाचाः 'मी नेहमीच ईडीला सहकार्य केलं आहे. आजही ज्या प्रश्नांबाबत चौकशी करण्यात येईल त्याबाबत मी उत्तर देणार आहे. ज्या भूखंडाबाबत चौकशी सुरु आहे तो मुळात वादग्रस्त आहे. एमआयडीसीचा भूखंड असल्याचं सांगून अद्याप त्याचा ताबा त्यांच्याकडे नाही. भूसंपादनाची प्रक्रिया एमआयडीसीतर्फे केलेली नाही. आता एमआयाडीसी या जागेवर दावा करत आहे. भूखंडाबाबत मोबदला दिल्याचे एमआयडीसीने दाखवून द्यावं त्यानंतर हा प्रश्न राहणार नाही,' अशी माहिती एकनाथ खडसेंनी दिली आहे. वाचाः '५ वर्षांनंतर पुन्हा ईडीच्या माध्यमातून या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. मी भाजपासोडून राष्ट्रवादीमध्ये गेल्यानंतर ही प्रक्रिया सुरु झाली. मला याहेतूबद्दल शंका आहे. गेल्या आठ दिवसांपासून जळगावमध्ये कुछ होने वाला है असा मेसेज फिरत आहे याचा अर्थ कार्यकर्त्यांना याची माहिती होती. राजकीय हेतूने हे सर्व सुरु असून मी याबाबतच्या चौकशीला सामोरे जाणार आहे,' असं खडसे म्हणाले आहेत.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2Ve76qR

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.