Type Here to Get Search Results !

केंद्र सरकार ट्वीटरसोबत का भांडतंय?; राष्ट्रवादीने सांगितलं कारण

मुंबई: ट्वीटरला देशाचे कायदे पाळावे लागतील, अशा स्पष्ट शब्दांत नवे माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री यांनी इशारा दिला असतानाच काँग्रेसने यावर तीव्र शब्दांत आपली नाराजी व्यक्त केली आहे. 'केंद्र सरकार ट्वीटरसोबत नेमकं का भांडतंय?', असा तीरकस सवालच अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादीचे प्रवक्ते यांनी उपस्थित केला आहे. ( ) वाचा: जगभरात आणि देशभरात ट्वीटरच्या माध्यमातून केंद्र सरकार, पंतप्रधान आणि भाजपवर लोक सध्या उघडपणे बोलत असल्याने हा भडीमार कसा थांबवायचा हा प्रश्न केंद्राला पडला आहे. त्यामुळेच केंद्र सरकारकडून महत्त्वाचे सोशल माध्यम असेलल्या ट्वीटरवर कारवाई करण्याच्या हालचाली सुरू आहेत, असा आरोप नवाब मलिक यांनी केला. वाचा: प्रत्येक देशात त्या देशातील कायद्यांतर्गत कुठलीही यंत्रणा असो वा आस्थापना असो त्यावर नियंत्रण ठेवणं किंवा कारवाई करणं हा अधिकार तेथील सरकारचा असतो, यात दुमत नाही पण केंद्र सरकार ट्वीटरसोबत का भांडतंय हा मात्र कळीचा प्रश्न आहे, असे मलिक म्हणाले. लोकांना मत मांडण्यासाठी ट्वीटरसारखा सक्षम प्लॅटफॉर्म मिळाला आहे. त्यांच्या अधिकारावर गदा आणणे योग्य ठरणार नाही, असेही मलिक यांनी पुढे नमूद केले. दरम्यान, देशाचे नवे माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पदभार स्वीकारल्यानंतर माध्यमांशी बोलताना ट्वीटरला थेट शब्दांत इशारा दिला आहे. सोशल मीडियावरील थर्ड पार्टी कंटेंटसाठी जबाबदारी निश्चित करणारे नवे नियम लागू करण्यात आले आहेत. त्यावरच बोट ठेवत वैष्णव यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. भारतात कायद्याच्या पुढे कुणीही नाही. त्यामुळेच ट्वीटरला या देशात सेवा देत असताना जे या देशातील नियम आहेत त्याचे पालन करावेच लागेल, असे वैष्णव यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले आहे. त्यावरच राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली आहे. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3dWHR2U

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.