Type Here to Get Search Results !

साताऱ्यात हाहाकार; आज ढिगाऱ्याखालून काढले २१ मृतदेह, १२ बेपत्ता

सातारा: सातारा जिल्ह्यात पावसाने हाहाकार माजवला असून पाटण तालुक्यात डोंगरकडे कोसळून झालेल्या दुर्घटनेत आज ढिगाऱ्यांखालून २१ जणांना बाहेर काढण्यात आले आहे. याबरोबरच मृतांचा आकडा ३० वर गेला आहे. तर अजूनही १२ जण बेपत्ता असल्याचे सांगितले जात आहे. (21 bodies recovered from and ) रात्री उशीरा हाती आलेल्या वृत्तानुसार पाटण तालुक्यातील मिरगाव येथे ढिगाऱ्यांखालून ६ मृतदेह मिळाले आहेत. अजून ४ लोकांचा शोध सुरु आहे. आंबेघर (ता. पाटण) येथे एनडीआरएफ ची मदतीची कार्यवाही सुरु असून रात्रीपर्यंत ११ मृतदेह मिळाले आहेत. क्लिक करा आणि वाचा- जिल्ह्यातील १ हजार ३२४ कुटुंबातील ५ हजार ६५६ जण स्थलांतरित सातारा जिल्ह्याला मुसळधार पावसाचा मोठा तडाखा बसला असून जिल्ह्यातील वाई, कराड पाटण व महाबळेश्वर तालुक्यातील नागरिकांना पुराचा मोठा धोका आहे. अशा एकूण १ हजार ३२४ कुटुंबातील ५ हजार ६५६ नागरिकांचे स्थलांतरण करण्यात आले आहे. यामध्ये वाई तालुक्यातील ७२ कुटुंबातील ३९० जण, कराड तालुक्यातील ८७६ कुटुंबातील ३ हजार ८३६ जण, पाटण तालुक्यातील ३२५ कुटुंबातील १ हजार ३०० जण, महाबळेश्वर तालुक्यातील ५१ कुटुंबातील १३० जणांचा समावेश आहे. क्लिक करा आणि वाचा- सातारा जिल्ह्यातील एकूण १६७ गावे मुसळधार पावसाने पूर्णपणे बाधित झालेली आहे. तर, २१२ गावे अंशत: बाधित झाल्याची माहिती आहे. म्हणजेच सातारा जिल्ह्यातील ३७९ गावांना मुसळधार पावसाचा मोठा फटका बसला आहे. क्लिक करा आणि वाचा- साताऱ्यात कोणत्या तालुक्यात किती गावे बाधित? > वाई तालुक्यातील ४४ गावे पूर्णत: व ७ गावे अंशत: अशी एकूण ५१ गावे बाधित > कराड तालुक्यातील एकूण ३० गावे अंशत: बाधित > पाटण तालुक्यातील १० गावे पूर्णत: व ६० गावे अंशत: अशी एकूण ७० गावे बाधित > महाबळेश्वर तालुक्यातील ११३ गावे पूर्णत: बाधित > सातारा तालुक्यातील १३ गावे अंशत: बाधित > जावळी तालुक्यातील १०२ गावे अंशत: बाधित झाली आहेत.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3rvEu8C

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.