Type Here to Get Search Results !

केंद्रात मंत्रिपद मिळताच कपिल पाटील यांचा मोठा निर्णय, नवी मुंबई विनातळाबद्दल म्हणाले...

भिवंडी : नवी मुंबई विमानतळाला स्वर्गीय लोकनेते दि. बा पाटील यांचं नाव देण्यावरून सुरू असलेला वाद हा सगळ्यांनाच माहिती आहे. यासंबंधी नवनियुक्त केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांना विचारलं असता, नवी मुंबई विमानतळावर लोकनेते दि. बा पाटील यांचं नाव द्यावं अशी माझी आणि स्थानिक भूमिपुत्रांची मागणी आहे. त्यांच्या या मागणीचा आणि त्यांच्या भावनांचा आदर केला गेलाच पाहिजे. त्यामुळे सरकारच्या निर्णयाकडे माझं लक्ष असणार आहे, असं पाटील यांनी म्हटलं आहे. दरम्यान, यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानत मोदींनी विश्वासाने दिलेल्या केंद्रीय मंत्रीपदाचा मी देशाच्या विकासासाठी जास्तीत जास्त फायदा करून घेणार आहे. माझी जन्मभूमी असलेल्या भिवंडी लोकसभेमध्येदेखील आणि ठाण्यातील विकास कामांकडेदेखील लक्ष देणार आहे, असं कपिल पाटील यांनी म्हटलं आहे. दरम्यान, बुधवारी कपिल पाटील यांनी शपथ घेतली. त्यांच्याकडे पंचायत राज विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. भिवंडी तालु्क्यातील दिवे अंजूर गावच्या सरपंचपदावरून कपिल पाटील यांनी आपला राजकीय प्रवास सुरू केला. त्यानंतर त्यांनी पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य म्हणूनही काम केले. यानंतर राष्ट्रवादीच्या वतीने जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांव्यतिरिक्त त्यांना मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्षपदही सोपविण्यात आले. कपिल पाटील यांचा भाजपला कोणता फायदा? कपिल पाटील यांच्या माध्यमातून नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजपला ओबीसी मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करायचा आहे. कपिल पाटील हे देखील भाजपचे ओबीसी चेहरा आहेत. ठाणे आणि नवी मुंबईत बहुसंख्येने असलेल्या आगरी समाजाचे ते नेते आहेत. नवी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला बाळासाहेब ठाकरे हे नाव न देता दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची त्यांनी मागणी केली होती. या मागणीसाठी आगरी समाज आक्रमक झाला आहे. या समाजातील नेत्याला केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देऊन भाजप आता शिवसेनेला कमकुवत करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/36qcIRe

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.