Type Here to Get Search Results !

मुंबई पोलिसांचा स्मार्टनेस, 'बचपन का प्यार' व्हायरल व्हिडिओचा असा केला फायदा

मुंबई : सध्या सोशल मीडियावर 'बचपन का प्यार' हे एक गाणं तुफान व्हायरल होत आहे. नेत्यापासून ते अभिनेत्यापर्यंत, प्रत्येकजण याबद्दल दररोज नवीन व्हिडिओ बनवत आहे. आता मुंबई पोलिसही यामध्ये मागे नाहीत. खरंतर, मुंबई पोलीस अशाच व्हायरल होणाऱ्या व्हिडिओंमधून नेहमीच जागरूकतेचा मेसेज देत असतात. अताही त्यांनी व्हिडिओशी संबंधित एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये लोकांना जागरूक करण्यात आलं आहे. काय केले मुंबई पोलिसांनी? मुंबई पोलीस ट्विटरवर नेहमी खास शैलीत ट्वीट करतात. त्यांच्या ट्विटरवरून पोस्ट केलेले मीम्स खूप व्हायरल होतात. आता मुंबई पोलिसांना 'बचपन का प्यार' आठवलं आहे. मुंबई पोलिसांचे एक ट्विट व्हायरल होत आहे. त्यामुळे लोकांचे मनोरंजन आणि जागरुकता दोन्ही साध्य होत आहे. मुंबई पोलिसांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एक ट्विट करण्यात आले आहे ज्यामध्ये लोकांना पासवर्ड सुरक्षित ठेवण्यासाठी आणि ऑनलाइन सुरक्षा राखण्यासाठी जागरूक करण्यात आलं आहे. मुंबई पोलिसांनी 'बचपन का प्यार' ची मीम शेअर केली आणि लिहिले की, "तुमचे बालपणाचे प्रेम रहस्य होते का? मग तुमचा पासवर्ड अजूनही सुरक्षित असू शकतो. फक्त त्यात काही खास कॅरेक्टर जोडा." कोणी गायलं आहे हे गाणं? व्हायरल होणारं हे गाणं सहदेव नावाच्या मुलाने २०१९मध्ये शाळेत गायला होता. त्याच्या शाळेच्या शिक्षकाने हा व्हिडिओ माध्यमांवर शेअर केला आहे. सहदेव (Sahdev Kumar Dirdo bachpan ka pyar song) छत्तीसगडच्या सुकमाच्या छिंदगड ब्लॉकच्या उर्मापाल गावातील रहिवासी आहे. मंडळी, या गाण्यासाठी फक्त नेतेच नाहीतर अनेक स्टारही वेडे झाले आहेत. बॉलिवूडकरांनाही हे गाणं खूप आवडलं आहे. अभिनेत्री अनुष्का शर्माने अलीकडेच इंस्टाग्रामवर एक मजेदार पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट व्हायरल झालेल्या 'जाने मेरी जानेमन, बचपन का प्यार' या गाण्याविषयी आहे. या पोस्टमध्ये अभिनेत्रीने सांगितले आहे की ती 'बचपन का प्यार' हे गाणे विसरू शकत नाही. इतकंच काय तर प्रसिद्ध गायक बादशाह याने सहदेवशी फोनवर बोलणं केलं आहे. त्यांनी सहदेवाला चंदीगडला बोलावलं आहे. बरेच लोक या गाण्याबद्दल मजेदार व्हिडिओ बनवत आहेत. पण याचा मुंहई पोलिसांनी मात्र उत्तम फायदा करून घेतला आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3iab3WF

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.