Type Here to Get Search Results !

चिपळूण आणि खेडमध्ये महापूर नेमका कशामुळे?; अहवालात 'हा' दावा

: जिल्ह्यातील चिपळूण आणि शहरांमध्ये महापुराने हाहाकार उडाला होता. दोन्ही शहरांमध्ये काही भागांत पाण्याची पातळी २५ फुटांपर्यंत गेली होती. या जलप्रलयातून दोन्ही शहरं अद्याप सावरलेली नसताना हा पूर केवळ अतिवृष्टीमुळे आला की धरणांतील पाण्याचा विसर्ग यास कारणीभूत होता, याबाबतचा उलगडा अखेर झाला आहे. पुराबाबत प्राथमिक अहवाल सादर करण्यात आला आहे. त्यात अनेक महत्त्वाच्या बाबी नमूद करण्यात आल्या आहेत. ( ) वाचा: चिपळूण आणि खेड शहरांमध्ये २२ जुलै रोजी महापुराने हाहाकार उडाला. अतिवृष्टीमुळे या भागात भीषण स्थिती निर्माण झाली. तुफास पाऊस सुरूच राहिल्याने पुढील तीन दिवस ही दोन्ही शहरं पाण्याखाली होती. या पुरात या दोन्ही शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात वाताहत झाली आहे. या पार्श्वभूमीवर पाटबंधारे खात्याच्या वतीने महापुरामागील कारणांचा शोध घेण्यात आला असून अतिवृष्टीमुळे या दोन्ही शहरांत महापूर आल्याचा प्राथमिक निष्कर्ष त्यातून काढण्यात आला आहे. तसा अहवाल शासनास सादर करण्यात आला आहे. वाचा: धरणातून पाणी सोडल्याने हा महापूर आला, असे म्हणता येणार नाही, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे. जगबुडी नदीचे पाणी नदीला मिळाल्याने फुगवटा निर्माण झाला असा उल्लेखदेखील करण्यात आला आहे. कोयना प्रकल्पाचे माजी मुख्य अभियंता व धरण सुरक्षा पुनर्स्थापना समितीचे अध्यक्ष दीपक मोडक यांनी हा अहवाल दिला आहे. या महापुराची चौकशी करण्याची मागणी करण्यात येत आहे. अशावेळी यापुराला सलग झालेला मुसळधार पाऊस कारणीभूत असल्याचं पाटबंधारे खात्याच्या प्राथमिक अहवालात म्हटलं आहे. कोळकेवाडी धरणातून ८ हजार ४०० क्यूसेक्स पाणी सोडण्यात आले होते असेही या अहवालामध्ये म्हटले आहे. मुख्य बाब म्हणजे चिपळूणला आलेल्या पुराची कारणमीमांसा करत त्याकरता उपाय देखील या अहवालामध्ये सूचवण्यात आले आहेत. या उपाययोजना आवश्यक - अतिवृष्टीत धरण आणि कालव्यांचे जे नुकसान झाले आहे त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे. ज्या धरणांना गळती आहे ती तातडीने बद केली जावी तसेच धरणांच्या सुरक्षिततेसाठई कामे हाती घेण्यात यावीत. - स्वयंचलित रेन गेज स्टेशन, स्वयंचलित रिव्हर गेज स्टेशन, अद्ययावत रडार यंत्रणा व संपर्क साधण्यासाठी सॅटेलाइट व्यवस्था असणे आवश्यक. पूरस्थितीत त्यामुळे नेमकी ताजी स्थिती प्राप्त होईल. - रियल टाइम डेटा सीस्टीम कोकणातील प्रत्येक जिल्ह्यात उभारणे आवश्यक. कृष्णा खोऱ्याच्या धर्तीवर ही यंत्रणा उभारावी. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3jeGkau

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.