Type Here to Get Search Results !

'लालबागचा राजा'च्या भाविकांसाठी मोठी बातमी; मंडळाने घेतला 'हा' निर्णय

मुंबई: मुंबईची शान असलेला ' 'चा यंदा साजरा होणार आहे. लालबागचा राजाच्या लाखो भाविकांसाठी ही मोठी आनंदाची बातमी ठरली आहे. याबाबत अंतिम निर्णय झाला असून नियम पाळून यंदा लालबागच्या राजाचं आगमन होणार आहे. गेल्या वर्षी भीषण कोविड स्थिती लक्षात घेत मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली नव्हती. ( ) वाचा: एक वर्षाचा खंड पडल्यानंतर लालबागचा राजा यंदा पुन्हा एकदा दिमाखात विराजमान होणार आहे. गेल्या वर्षी कोविड १९ संसर्गामुळे लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने "आरोग्य उत्सव" साजरा करून आदर्श निर्माण केला होता. मंडळाच्या या निर्णयाची खुद्द मुख्यमंत्री यांनी स्तुती केली होती. त्याचवेळी अनेक मंडळांनी या निर्णयाचे अनुकरण केले होते. त्यानंतर यंदा गणेश भक्तांच्या विनंती वरून लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार गणेशोत्सव साजरा करणार असल्याचं जाहीर केले आहे. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात आपल्या लाडक्या लालबागच्या राजाचं दर्शन भाविकांना घेता येणार आहे. गणेश मूर्तींच्या उंचीबाबत सरकारने नियमावली घालून दिली आहे ते पाहता लालबागच्या राजाची मूर्ती यंदा चार फुटांची असेल असेही स्पष्ट करण्यात आले आहे. लालबागचा राजाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी उसळते. सध्याच्या कोविड काळात अशी गर्दी टाळणे आवश्यक असल्याने त्याबाबतही मंडळाकडून आखणी करण्यात आली आहे. त्यासाठी ऑनलाइन दर्शनाला प्राधान्य देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. वाचा: भाविकांसाठी ऑनलाइन दर्शनाची व्यवस्था करोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करतानाच सर्व नियम पाळून यंदाचा गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. भाविकांना ऑनलाइन दर्शनाची योग्य व्यवस्था मंडळातर्फे केली जाणार आहे, अशी माहिती लालबागचा राजा उत्सव मंडळाचे सचिव यांनी 'मटा ऑनलाइन'ला दिली. गेल्यावर्षी करोनाच्या प्रादुर्भावामुळे उत्सव रद्द करण्यात आला होता व त्याऐवजी आरोग्य उत्सव आम्ही साजरा केला होता. यंदा राजाचं आगमन होत असल्याने लालबागच्या राजाच्या मंडपात 'गणपती बाप्पा मोरया'चा जयघोष घुमणार आहे, असे नमूद करत साळवी यांनी आनंद व्यक्त केला. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2WG763Q

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.