Type Here to Get Search Results !

ठाकरेंचा आदेश निघाला; शिवसेना आमदारांची पूरग्रस्तांसाठी मोठी घोषणा

मुंबई: शिवसेनेत ठाकरेंचा आदेश शिरसावंद्य मानला जातो. ठाकरेंचा आदेश निघाला की त्याची तातडीने अंमलबजावणी केली जाते. आता पूरसंकटातही त्याचा प्रत्यय आला असून मातोश्रीवरून आदेश निघताच शिवसेनेच्या सर्व आमदारांनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी कंबर कसली आहे. त्यात एक महिन्याचे वेतन पूरग्रस्तांना देण्याचा निर्णय आज जाहीर करण्यात आला आहे. ( Maharashtra Floods ) वाचा: महाराष्टातील विविध भागांत नुकत्याच आलेल्या पुरातील आपत्तीग्रस्तांसाठी सामाजिक बांधिलकी म्हणून शिवसेनेचे सर्व मंत्री, राज्यमंत्री व विधानसभा आणि विधानपरिषद आमदारांचे एक महिन्याचे वेतन देण्यात येणार आहे, असे नगरविकास मंत्री तसेच विधिमंडळ पक्षाचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी सांगितले आहे. मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख आणि पर्यावरण मंत्री यांच्या सूचनेनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे, असेही या दोन्ही नेत्यांनी स्पष्ट केले आहे. वाचा: दरम्यान, शिवसेना पक्ष सत्तेत असला आणि पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री असले तरी सरकारकडून होणाऱ्या मदतीव्यतिरिक्त पक्षपातळीवर मदतकार्याला सुरुवात करण्यात आली आहे. शिवसेनेचे अनेक नेते व पदाधिकारी पूरग्रस्त भागात मदत पोहचवण्यासाठी झटत आहेत. आदित्य ठाकरे आज चिपळूण दौऱ्यावर असून तिथेही त्यांनी हीच माहिती दिली. पंचनामे पूर्ण झाल्यानंतर सरकारकडून योग्य अशी मदत पूरग्रस्तांना मिळणारच आहे पण दुसरीकडे शिवसेनेकडून पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी आम्ही सगळेजण प्रयत्न करत आहोत. त्याचा आढावा घेण्यासाठीच मी येथे आलो आहे, असे आदित्य यांनी सांगितले. राष्ट्रवादीच्या खासदार-आमदारांकडूनही मदत शिवसेनेच्या आधी राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही अशाप्रकारचा निर्णय घेण्यात आला आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व आमदार व खासदार आपले एक महिन्याचे वेतन देतील, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. त्याचवेळी राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या माध्यमातूनही मोठ्या प्रमाणात मदत करण्यात येत आहे. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/374QDbi

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.