Type Here to Get Search Results !

रायगड: 'तळिये'नंतर 'या' १३ गावांना धोका; ४१३ कुटुंबांना तातडीने हलवणार

अलिबाग: जिल्ह्यातील गावातील दरड दुर्घटनेने सगळेच हादरले असताना तालुक्यातील आणखी ४ आणि तालुक्यातील ९ गावांमध्ये तळियेसारखी दुर्घटना येत्या काळात घडू शकते, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. एका सर्वेक्षणातून ही बाब समोर आल्यानंतर या गावांतील ४१३ कुटुंबांना तातडीने सुरक्षित स्थळी हलवण्याच्या सूचना रायगड जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांनी दिल्या आहेत. दरम्यान, महाडमधील तळिये गावात दरड कोसळून अनेक घरे त्यात गाडली गेली होती. या दुर्घटनेत ९५ जणांचा बळी गेला होता. ( ) वाचा: महाड तालुक्यातील हिरकणी वाडी, मोहोत सुतारवाडी, मोहोत भिसेवाडी, वाघेरी तर पोलादपूर तालुक्यातील साखर सुतारवाडी, साखर चव्हाणवाडी, साखर पेढेवाडी, केवनाळे, दाभीळ, चरई, माटवण, सवाद आणि कनगुले या गावांमध्ये दरडी कोसळण्याची भीती असल्याने तळियेसारख्या दुर्घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी तातडीने पावले टाकण्यात आली आहेत. या गावांमधील एकूण ४१३ कुटुंबांना धोका असून या कुटुंबांमध्ये १ हजार ५५५ व्यक्ती आहेत. या सर्वांनाच सुरक्षित स्थळी हलवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत असे एका अधिकाऱ्याने सांगितले. वाचा: दोन्ही तालुक्यांमधील संबंधित गावांमध्ये दरड दुर्घटना होऊ शकते असा प्राथमिक अहवाल प्राप्त झाला आहे. त्याआधारावर खबरदारी म्हणून तेथील कुटुंबांना अन्यत्र हलवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे, असे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. भारतीय भूवैज्ञानिक विभाग यांच्या पुणे युनिटने या भागाचे सर्वेक्षण केले असून त्यांचा अहवाल लवकरच मिळणार आहे, असेही नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, महाड येथे एनडीआरएफचा कायमस्वरूपी तळ उभारण्यासाठी कृषी विभागाची ५ एकर जमीन देण्यात आली आहे, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे. तर ११ जुलै रोजी अतिवृष्टीदरम्यान काशीद पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत मृत पावलेल्या विजय चव्हाण यांच्या कुटुंबीयांना चार लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3BWCxa8

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.