Type Here to Get Search Results !

'पूरग्रस्तांना तांदूळ, डाळ व रॉकेल देणार; डाळ खिचडी तरी खाता येईल'

पुणे: राज्यातील पूरग्रस्तांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकार करत असलेल्या उपाययोजनांची माहिती उपमुख्यमंत्री यांनी आज दिली. 'पुरामुळे अनेक भागांत वीज नाही. गिरण्या बंद आहेत. त्यामुळं या भागातील लोकांना गव्हाऐवजी तांदूळ, डाळ आणि रॉकेल दिले जाणार आहे. हेलिकॉप्टरमधून बोटीनं डाळ, तांदूळ व पाण्याच्या बाटल्या पोहोचवल्या जातील, अशी माहिती अजित पवार यांनी आज दिली. ( on and Government Measures) अजित पवार यांच्या हस्ते आज पुण्यात मोबाइल ऑक्सिजन जनरेशन प्लांटचे उद्घाटन झाले. त्यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी राज्यातील पूरस्थितीची व सरकारच्या निर्णयांची माहिती दिली. पूरग्रस्तांना अन्नधान्य व पिण्याचे पाणी पोहोचवण्यास सरकारचं प्राधान्य आहे. वीज नसल्यामुळं व गिरण्या बंद असल्यामुळं लोकांना गहू देऊन उपयोग होणार नाही. त्यांना तांदूळ, डाळ व रॉकेल दिले जाईल. जेणेकरून लोक खिचडी करून खाऊ शकतील. शिवभोजन केंद्रांची संख्याही वाढवली जाईल. या कामासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असं अजित पवार म्हणाले. स्थानिक अधिकाऱ्यांनी आपल्या स्तरावर निर्णय घ्यावेत, आदेशाची वाट पाहू नये, अशा सूचना देण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. राज्यात आतापर्यंत ७६ मृत्यू झाले असून ५९ लोक बेपत्ता आहेत, तर ३८ जखमींवर उपचार सुरू आहेत. ७५ जनावरेही दगावली आहेत. ९० हजारांहून अधिक नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलं आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. मुख्यमंत्री सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. लष्कर, नौदल, हवाई दल, एनडीआरएफची मदत मिळत असून मुख्यमंत्री संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत, असं ते म्हणाले. आणखी काय म्हणाले अजित पवार? हवामान विभागाचे बरेचसे अंदाज आता खरे ठरताहेत; अजित पवार यांनी केलं कौतुक वाशिष्ठी नदीवरील पूल कोसळल्याने पर्यायी रस्त्याचे काम वेगाने करणार सर्व पालकमंत्र्यांना आपापल्या जिल्ह्यातच थांबण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत कोल्हापूरात पाणीपातळी धोकादायक पातळीच्या वर धरण खोलीकरणाचा पूरस्थितीशी काहीही संबंध नाही जर्मनी, चीनमध्येही प्रचंड पूर आले, तिथंही हानी झाली. प्रचंड पाऊस झाल्यास अशी परिस्थिती ओढवते. राजकारण न करता मदत करण्याचं अजित पवार यांचं आवाहन महाडमध्ये तिळये गावाजवळ काल परवा हेलिकॉप्टरही उतरवणे शक्य नव्हते व्हीव्हीआयपींनी दौरा केल्यास प्रशासन त्यातच अडकते. मी पुणे जिल्ह्यातच थांबणार वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3zwYH0A

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.