Type Here to Get Search Results !

राज्यात करोना रिकव्हरी रेट पुन्हा घसरला; 'हे' आकडे चिंता वाढवणारे

मुंबई: राज्यात करोनाची साथ नियंत्रणात येत असताना दैनंदिन बाधितांचा आकडा अपेक्षित प्रमाणात कमी होत नसल्याने चिंता अजूनही कायम आहे. त्यात आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांच्या संख्येतही मोठी घट पाहायला मिळाली. आज दिवसभरात राज्यात ९ हजार ३३६ नवीन रुग्णांची भर पडली तर त्याचवेळी ३ हजार ३७८ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले. दरम्यान, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६ टक्क्यांवर पोहचले होते. ते पुन्हा एकदा ९५.९१ टक्क्यांपर्यंत खाली आले आहे. ( ) वाचा: करोना संसर्गाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत राज्यात रुग्णसंख्येत सातत्याने चढ उतार पाहायला मिळालेला आहे. राज्यात दुसऱ्या लाटेत सक्रिय रुग्णांची संख्या ७ लाखांच्या जवळ पोहचली होती तर दैनंदिन रुग्णसंख्याही ७० हजारांच्या उंबरठ्यावर गेली होती. ही स्थिती आता नियंत्रणात आली असली तरी दैनंदिन रुग्णसंख्या १० हजारांच्या टप्प्यावर रेंगाळली असल्याने अजून आरोग्य यंत्रणांपुढील आव्हान कायम असल्याचेच दिसत आहे. दैनंदिन रुग्णसंख्या आणखी खाली यायला हवी, असे सरकार पातळीवर सर्वांचेच मत आहे. त्यातूनच निर्बंधांबाबतही सरकारकडून सावध पावलं उचलण्यात येत आहेत. राज्यातील आजच्या आकडेवारीवर नजर मारल्यास नवीन बाधितांच्या तुलनेत करोनामुक्त रुग्णांची संख्या खूपच कमी असल्याने त्याचा परिणाम रिकव्हरी रेटवर झाला आहे. त्याचवेळी सक्रिय रुग्णसंख्याही पुन्हा सव्वालाखाच्या जवळ पोहचली आहे. वाचा: राज्यातील करोनाची आजची स्थिती: - राज्यात आज १२३ रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. सध्या राज्यातील मृत्यूदर २.०१ % एवढा. - आज राज्यात ९,३३६ नवीन रुग्णांचे निदान. आज ३,३७८ रुग्ण बरे होऊन परतले घरी. - आजपर्यंत एकूण ५८,४८,६९३ रुग्णांची करोनावर मात. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.९१ % एवढे. - राज्यात करोनाचे सध्या १ लाख २३ हजार २२५ सक्रिय रुग्ण. जिल्ह्यात सर्वाधिक १८ हजार २४२ रुग्ण. - जिल्ह्यात १६ हजार ८०१, जिल्ह्यात १४ हजार ७०१ तर मुबईत १२ हजार २९५ सक्रिय रुग्ण. - आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,२५,४२,९४३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६०,९८,१७७ (१४.३३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह. - सध्या राज्यात ६,३८,००४ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत तर ४,१९८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3qIlt2w

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.