Type Here to Get Search Results !

चिंता वाढली! राज्यात म्युकरमायकोसिसचे १ हजार बळी

मुंबई: राज्यात करोनाची दुसरी लाट ओसरत असताना म्युकरमायकोसिसनं चिंता वाढवली आहे. म्युकरमायकोसिसच्या रुग्णांची संख्या ९ हजारपर्यंत पोहोचली असून आतापर्यंत या आजारानं एक हजारहून अधिक लोकांचे बळी घेतले आहेत. (Maharashtra Records 1000 Deaths) मे महिन्यात म्युकरमायकोसिसचा पहिला रुग्ण राज्यात आढळला होता. तेव्हापासून आतापर्यंत ८९२० रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी ४,३५७ रुग्ण बरे झाले असून १०१४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रुग्णवाढीचा वेग मंदावला असला तरी सध्या ३,३९५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. वाचा: म्युकरमुळं राज्यात झालेल्या एकूण मृत्यूंपैकी सर्वाधिक १७८ मृत्यू पुणे जिल्ह्यात झाले आहेत. त्याखालोखाल मुंबईत १२९ तर नागपुरात ११८ मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या पुण्यात जास्त आहे. तर, मुंबई उपचार सुरू असलेले एक तृतीयांश रुग्ण शहराबाहेरील आहेत, असं महापालिकेचं म्हणणं आहे. वाचा: म्युकरमायकोसिसचा धोका वाढत असला तरी लोक रुग्णालयात राहणं टाळत असल्याचंही समोर आलं आहे. राज्यभरात १५४ रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्याच्या विरोधात जाऊन डिस्चार्ज घेतला आहे. उपचाराचा खर्च, डोळ्यांवरील शस्त्रक्रियेला घाबरून रुग्ण हा निर्णय घेत आहेत. जिथं उपचारांचा खर्च १० लाखांपेक्षा अधिक आहे, अशा खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांकडून डिस्चार्ज घेण्याचं प्रमाण जास्त आहे, अशी माहिती राज्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2SQDJdB

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.