Type Here to Get Search Results !

मुंबईत घर खरेदीत मोठी वाढ; जूनमधील आकडा थक्क करणारा

म. टा. विशेष प्रतिनिधी मुंबई : करोनाच्या दुसऱ्या लाटेतही गृहनिर्माण क्षेत्रात चांगली कामगिरी पाहायला मिळत असून त्याचे प्रतिबिंब जून २०२१ मधील मुंबईतील घरांच्या नोंदणीतील अहवालातून उमटले आहे. संपूर्ण मुंबईत जूनमध्ये ७,८५७ घरांची नोंदणी झाली आहे. मे महिन्याच्या तुलनेत नोंदणीचे प्रमाण ४७ टक्क्यांनी वाढले आहे. त्यापैकी, नवीन घरांच्या खरेदीचे प्रमाण ४२ टक्के आहे. तसेच, गतवर्षीच्या जूनची तुलना केल्यास ती ३२७ टक्क्यांवर पोहोचली आहे. मुंबईतील गृहनिर्माण क्षेत्रातील घरांची खरेदी-विक्री हा घटक नेहमीच महत्त्वाचा ठरत असतो. त्या क्षेत्रात करोनाच्या पहिल्या टप्प्यातील काही कालावधी वगळता या क्षेत्राला उर्जितावस्था आल्याचे आढळून आले. त्यासाठी राज्य सरकारने जाहीर केलेल्या मुद्रांक शुल्क कपातीसारख्या काही निर्णयांचा आधार मिळाला. राज्य सरकारने ही सवलत मागे घेतल्यानंतरही घरांच्या खरेदीसाठी अनुकूलता दिसत आहे. मुंबईचा विचार करताना एकट्या जूनमध्ये ७,८५७ घरांची नोंद ही नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाकडे झाली आहे. वाचा: राज्य सरकारने ८ मार्च २०२१ मध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करताना घर खरेदीत मुद्रांक शुल्कावर एक टक्का सवलत देण्याचा निर्णय घेतला होता. त्याचा चांगला परिणाम दिसून येत असून एप्रिलमध्ये एकूण नोंदणी झालेल्या घरांपैकी ६.६ टक्के घरांची नोंदणी महिलांच्या नावे होती. जूनमध्ये ७,८५७ घरांच्या नोंदणीत महिलांचा वाटा ४.७ टक्के एवढा आहे. 'नाइट फ्रँक रिसर्च' संस्थेच्या अहवालातून गेल्या वर्षापासूनच्या घरांच्या नोंदणीचा आढावा घेण्यात आला आहे. वाचा: २०२१ मधील घरांची नोंदणी महिना - नोंदणी जानेवारी १०,४१२ फेब्रुवारी १०,७१२ मार्च १७,४४९ एप्रिल १०,१३६ मे ५,३६० जून ७,८५७ (स्त्रोत : नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभाग)


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3AmDisn

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.