Type Here to Get Search Results !

गणपती स्पेशल गाड्यांचं बुकिंग फुल्ल; भाजपची रेल्वे राज्यमंत्र्यांना 'ही' विनंती

पुणे: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गाड्यांचं बुकिंग मे महिन्यातच फुल्ल होते. त्यामुळं रेल्वेकडून विशेष गाड्या सोडल्या जातात. यंदा रेल्वेनं चाकरमान्यांसाठी सोडलेल्या ७२ विशेष रेल्वे गाड्या फुल्ल झाल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर कोकणात जाण्यासाठी अधिकच्या गाड्या सोडण्याची मागणी भाजपचे आमदार अॅड. यांनी रेल्वे राज्यमंत्री यांच्याकडं केली आहे. (Ganpati Special Railway Trains for Konkan) वाचा: गणेशोत्सवाठी मुंबई, ठाणे, नवी मुंबई, वसई, विरार या भागातून मोठ्या प्रमाणात चाकरमानी कोकणातील आपल्या गावी जातात. यावर्षी कोकण रेल्वेने ७२ अतिरिक्त उत्सव विशेष गाड्या सोडण्याची घोषणा केली आणि बुकिंग सुरू होताच काही दिवसांतच बुकिंग फुल्ल झाले. मात्र, बरेच चाकरमानी अद्यापही प्रतीक्षा यादीतच आहेत. दरवर्षीच्या तुलनेत यंदा सोडण्यात आलेल्या गाड्या कमी आहेत. २०१९ ला कोकण रेल्वेवर २१० फेऱ्यांची सोय करण्यात आली होती. रेल्वे गाड्यांना ६४७ अतिरिक्त डबेही जोडण्यात आले होते. त्या वर्षी तिकिटांच्या ज्यादा बुकिंगसाठी ११ टपाल खात्यांत, १७ रेल्वे स्थानकांमध्ये पीआरएस सिस्टम आणि १६ ठिकाणी टाऊन बुकिंग एजन्सी आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. वाचा: आशिष शेलार यांनी पुणे दौऱ्यावर असलेले रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेऊन या बाबी त्यांच्या निदर्शनास आणल्या. २०१९ प्रमाणेच यंदाही अधिकच्या बुकिंग सुविधा व अजूनच्या काही गाड्या कोकणातील चाकरमान्यांना उपलब्ध करून देण्याबाबत कोकण रेल्वेला निर्देश द्यावेत, अशी विनंती शेलार यांनी दानवे यांच्याकडं केली आहे. यावेळी भाजप शहर अध्यक्ष जगदीश मुळीक व योगेश टिळेकर आदी उपस्थित होते. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2T1w4ZR

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.