Type Here to Get Search Results !

‘पेगॅसस’चा हल्ला हा आणीबाणीपेक्षा भयंकर; त्याचे खरे बाप देशातच!

मुंबई: '' या इस्रायली स्पायवेअरच्या मदतीनं भारतातील अनेक महत्त्वाच्या व्यक्तींचे फोन टॅप करण्यात आल्याचे प्रकरण उजेडात आल्यानंतर देशात गदारोळ माजला आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात याचे तीव्र पडसाद उमटले असून या प्रकरणाची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करण्याची मागणी होत आहे. शिवसेनेनं ही संधी साधत मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे. ‘पेगॅसस’चा हल्ला हा आणीबाणीपेक्षा भयंकर आहे. ‘पेगॅसस’चे खरे बाप आपल्याच देशात आहेत,' असं शिवसेनेनं म्हटलं आहे. ( Issue) शिवसेनेचं मुखपत्र ''च्या अग्रलेखातून 'पेगॅसस' हेरगिरी प्रकरणावर भाष्य करण्यात आलं आहे. 'पेगॅसस’ हा निवडक भारतीयांवर झालेला सायबर हल्ला आहे. संसदेचं अधिवेशन सुरू होत असताना हे प्रकरण समोर आलं. हा सरळ सरळ हेरगिरी करण्याचाच प्रकार आहे. काही हजार लोकांच्या मोबाइल फोनमध्ये एक ‘अॅप’ सोडला. फोन हॅक केले व या सगळ्या प्रमुख लोकांचे संभाषण ऐकण्यात आले. जगातील सगळ्यात मोठ्या लोकशाहीत हे घडलं. केंद्र सरकारच्या संमतीशिवाय असा हल्ला होऊ शकत नाही,' असा दावा शिवसेनेनं केला आहे. वाचा: देशाला आणि लोकशाहीला बदनाम करण्याचं हे आंतरराष्ट्रीय कारस्थान आहे, असं गृहमंत्री अमित शाह यांनी या संदर्भातील आरोपांना उत्तर देताना म्हटलं आहे. शिवसेनेनं शहा यांच्या या विधानावर आश्चर्य व्यक्त केलं आहे. 'देशाला बदनाम नक्की कोण करीत आहे, हे श्रीमान गृहमंत्री सांगू शकतील काय? सरकार तुमचं, देश आणि लोकशाही तुमची. मग हे सर्व करण्याची हिंमत कोणात आहे? ‘पेगॅसस’सारखे इलेक्ट्रॉनिक अस्त्र हजारो लोकांचे फोन सहज चोरून ऐकते हे काय अतिसावधान मोदी सरकारला माहीत नाही? ‘पेगॅसस’च्या हेरगिरीची व्याप्ती मोठी आहे. देशातील नागरिकांचा पैसा त्यांच्यावरच पाळत ठेवण्यासाठी व त्यांचेच फोन ‘हॅक’ करण्यासाठी वापरला जातोय. हा राष्ट्रभक्तीचा कोणता प्रकार मानायचा?,' अशा प्रश्नांची माळच शिवसेनेनं लावली आहे. 'या प्रकरणाची चौकशी संयुक्त संसदीय समितीमार्फत व्हायल हवी. तसं न झाल्यास सर्वोच्च न्यायालयानं ‘स्यु मोटो’ दाखल करून घेऊन स्वतंत्र चौकशी समिती नेमावी. त्यातच राष्ट्रहित आहे,' असं शिवसेनेनं म्हटलं आहे. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3wRgP3z

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.