Type Here to Get Search Results !

शिवसेनेचा 'हा' बालेकिल्ला काबीज करण्यासाठी नारायण राणेंना बळ!

सिंधुदुर्ग: अपेक्षेप्रमाणे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान खासदार यांना केंद्रीय मंत्रिमंडळात मानाचे स्थान मिळाले आहे. राणेंनी मंत्रिपदाची शपथ घेताच कोकणातील त्यांच्या निकटवर्तीयांनी एकच जल्लोष केला. कोकणातील शिवसेनेची ताकद कमी करण्यासाठी भाजपने हे पाऊल उचलले आहे, असे येथील जाणकारांचे म्हणणे आहे. ( ) वाचा: भारतीय जनता पक्षाचा काही अपवाद वगळता आणि जिल्ह्यांत प्रभाव नाही हे ओळखून भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने राणेंना मंत्रिमंडळात संधी दिली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांवर राणेंची मजबूत पकड आहे. सिंधुदुर्गातील जिल्हा परिषद आणि बहुसंख्य ग्रामपंचायती राणेंच्या ताब्यात आहेत. त्यांच्या मदतीने सिंधुदुर्ग जिल्हा परिषद भाजपकडे आली मात्र रत्नागिरीत शिवसेनेची पकड आजही मजबूत आहे. तिथे भाजपचा झेंडा रोवण्यासाठी राणेंची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे भाजपला एकूणच कोकणात फायदा होण्याची शक्यता आहे. भाजपने या सर्व मुद्द्यांचा विचार करून राणेंना केंद्रात स्थान दिले आहे. मुंबईतील शिवसैनिक, नंतर नगरसेवक, बेस्ट समितीचे चेअरमन, कणकवलीचे आमदार, मंत्री, मुख्यमंत्री, विधानसभेचे विरोधी पक्ष नेते आणि आता केंद्रीय मंत्री असा दमदार प्रवास राणे यांनी केला आहे. वाचा: राणेंचा शपथविधी झाल्यानंतर आमदार नितेश राणे, माजी खासदार निलेश राणे यांनी एकमेकांना लाडू भरवून आनंद व्यक्त केला. आमदार म्हणाले, 'काँग्रेसला बारा वर्षात जमले नाही ते भाजपने एक-दोन वर्षांतच करून दाखवले. मला आमदारकीचे तिकीट दिले. निलेश यांना भाजपचे सरचिटणीस केले आणि नारायण राणे यांना खासदार आणि मंत्री केले. भाजप नेतृत्वाचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत.'


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3wipVWQ

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.