Type Here to Get Search Results !

'तुम्ही एकच काच फोडली, आम्ही एक सुद्धा शिल्लक ठेवणार नाही'

सिंधुदुर्ग: भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेतील आमदार () यांच्या कारवर बुधवारी सायंकाळी दगडफेक करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर शेलक्या शब्दांत टीका केल्यानं ही दगडफेक झाल्याचं सांगितलं जातं. त्यावरून आता भाजपकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. माजी खासदार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला थेट इशाराच दिला आहे. ( Over Stone Pelting Incident in Solapur) वाचा: 'गोपीचंद पडळकर यांच्या गाडीची एक काच फोडून मोठा पराक्रम केला असं कुणाला वाटतं असेल तर एवढं लक्षात ठेवा, जेव्हा तुमच्या हातातली सत्ता जाईल, तेव्हा फुटलेल्या काचा मोजण्यात पुढची पाच वर्षे जातील. तुम्ही तरी एकच काच फोडली, आम्ही एक सुद्धा शिल्लक ठेवणार नाही,' अशी धमकीच नीलेश राणे यांनी ट्वीटच्या माध्यमातून दिली आहे. गोपीचंद पडळकर हे सोलापूर शहरातील मड्डी वस्ती परिसरातील एसबीआय कॉलनी येथे आपल्या वाहनातून घोंगडी बैठकीला आले होते. त्यावेळी त्यांच्या गाडीची काच फुटल्याचं निदर्शनास आलं. कोणीतरी अज्ञात व्यक्तीनं गाडीवर दगड मारून काच फोडल्याचं सांगण्यात येतं. हे कृत्य नेमकं कोणी आणि का केलं हे कळू शकलेलं नसलं तरी पवारांवरील टीकेची ही प्रतिक्रिया असावी, असं बोललं जात आहे. काय म्हणाले होते पडळकर? सोलापूर येथे बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत पडळकर यांनी जोरदार टीकास्त्र सोडले होते. 'शरद पवार (Sharad Pawar) हे साडेतीन जिल्ह्यांचे स्वामी आहेत. ते मोठे नेते आहेत असं मी मानत नाही, तुम्ही कोणी तसं मानत असाल तर तो तुमचा प्रश्न आहे, असं पडळकर म्हणाले होते. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरूनही पडळकर यांनी राष्ट्रवादी व काँग्रेसवर टीका केली होती. या दोन्ही पक्षाचा डीएनए बहुजन विरोधी आहे, असं ते म्हणाले होते. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3y7PbR1

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.