Type Here to Get Search Results !

मीरा रोड येथील 'त्या' फेरीवाल्याला मनसेने दिला मदतीचा हात

मीरा-भाईंदर: मीरा भाईंदर महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी विभागाची मीरा रोडमधील कारवाई वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. हातगाडीवर कारवाई करताना सर्व साहित्य जप्त करण्याऐवजी ते कचऱ्यात फेकून देत हातगाडीची पूर्णपणे तोडफोड करण्यात आली असून हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यावर उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत. अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करायला हवी पण कारवाईच्या पद्धतीवर नाराजी व्यक्त होत असून संबंधित फेरीवाल्याला मोठ्या प्रमाणात सहानुभूती मिळताना दिसत आहे. यात मनसेही फेरीवाल्याच्या बाजूने उभी राहिली असून कालच्या कारवाईनंतर आज लगेचच मनसेकडून या फेरीवाल्याला नवीन हातगाडी देण्यात आली आहे. ( ) वाचा: येथील नयानगरमध्ये मंगळवारी पोलीस बंदोबस्तात महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने कारवाई केली. यात या फेरीवाल्यावरही कारवाई झाली. मालवीय हे हातगाडीवर सॅनिटायझर, मास्क, हँडग्लोव्हज व विविध प्रकारचं प्लास्टिकचं साहित्य विकतात. हे सर्व साहित्य फेकून देण्यात आलं व नंतर अतिक्रमण विभागातील दोन कर्मचाऱ्यांनी हातगाडीवर हातोडा चालवला. हातगाडी पूर्ण तुटेपर्यंत हातोड्याचे प्रहार सुरू होते. जवळच्याच इमारतीतून या कारवाईचे चित्रण करण्यात आले असून हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यावर त्यावर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. वाचा: ही कारवाई ज्या पद्धतीने करण्यात आली त्यावर अनेक लोकांकडून आक्षेप घेण्यात येत आहे. त्याचवेळी मालवीय यांना मदत करण्यासाठीही अनेक हात पुढे येत आहेत. मालवीय यांच्या पाठीशी उभी राहिली असून मनसे ठाणे जिल्हाध्यक्ष यांनी तर मालवीय यांना पुन्हा व्यवसाय करता यावा म्हणून आज नवीन हातगाडीही दिली आहे. करोना काळात लोकांची जी आर्थिक कुचंबणा झाली आहे ती लक्षात घेता पालिकेने अशाप्रकारे हातगाडी तोडण्याची कारवाई न करता दंड आकारावा, अशी मागणी जाधव यांनी केली आहे. दरम्यान, मीरा भाईंदरच्या महापौर यांनीही अशाप्रकारे कारवाई करण्यावर आक्षेप घेतला आहे. ना फेरीवाला क्षेत्रात फेरीवाला असणे हे बेकायदाच आहे पण कारवाईची ही पद्धत असू शकत नाही. नियमांच्या चौकटीत राहूनच कारवाई व्हायला हवी, असे नमूद करताना संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3y95vky

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.