Type Here to Get Search Results !

शेतकऱ्यांना दिलासा! येत्या ५ दिवसांत राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज

मुंबईः जून महिन्याच्या सुरुवातीला कमी अधिक प्रमाणा कोसळणाऱ्या पावसानं जुनच्या मध्यापासून राज्यातील अनेक भागात दडी मारली आहे. पण आता पाऊस परतण्याची चिन्हे आहेत. येत्या पाच दिवसांत राज्यासह देशभरात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. पुढील पाच दिवसांत देशाच्या विविध राज्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. त्यादृष्टीने स्थानिक प्रशासनाने दक्ष राहावे, अशा सूचनाही दिल्या आहेत. १ जुलैपासून महाराष्ट्रातील कोकण, मध्य महाराष्ट्रासह गोवा आणि कर्नाटकमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. नैऋत्येकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळं पाऊस पश्चिम बंगाल, सिक्किम आणि इशान्येकडील राज्यांच्या दिशेनं सरकण्याची अधिक शक्यता आहे. राज्यात यंदा मोसमी पावसाने चांगली प्रगती केली आहे. ५ जूनला कोकणातून दाखल झाल्यानंतर तीन ते चार दिवसांतच त्याने राज्य व्यापलं. मात्र काही ठिकाणी सरासरीपेक्षा कमी, तर काही ठिकाणी सरासरीच्या दुपटीपेक्षा अधिक पाऊस झाला. त्यामुळे नैऋत्य मोसमी पावसाच्या पहिल्या टप्प्यातील पहिल्याच महिन्यात राज्यात पाऊस झाल्याचं स्पष्ट झाले आहे. एकूण राज्यात सरासरीपेक्षा अधिक ४० टक्के पाऊस झाला आहे. वाचाः पेरण्यांची लगबग मृग नक्षत्राच्या सुरुवातीला पावसाचे प्रमाण कमी होते. त्यामुळं शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. मात्र, गेल्या आठवड्यापासून कमी- अधिक प्रमाणात पाऊस पडत आहे. त्यामुळं पुन्हा एकदा शेतकऱ्यांनी खोळंबलेल्या पेरणी व इतर कामांना सुरुवात केली आहे. वाचाः


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3hgQXbF

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.