Type Here to Get Search Results !

चौकशी, अटकही भाजपच करणार का?; 'त्या' मागणीवरून राष्ट्रवादीचा संताप

मुंबई: सचिन वाझेने केलेल्या आरोपांच्या आधारे उपमुख्यमंत्री आणि परिवहन मंत्री यांची सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश भाजपने आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केल्याने राजकारण तापलं असून काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते व अल्पसंख्याक मंत्री यांनी अत्यंत धारदार शब्दांत भाजपवर निशाणा साधला आहे. 'भाजपच्या असल्या डावपेचांना महाविकास आघाडीतील एकही पक्ष घाबरत नाही', असा इशाराच मलिक यांनी दिला आहे. ( Latest Update ) वाचा: उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांची सीबीआय चौकशी करावी, असा ठराव नुकत्याच झालेल्या भाजप प्रदेश कार्यकारिणी बैठकीत करण्यात आला होता. त्यानंतर आता हीच मागणी प्रदेशाध्यक्ष यांनी आज एका पत्राद्वारे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली आहे. या अनुषंगाने नवाब मलिक यांनी भाजपवर तीव्र शब्दांत हल्ला चढवला आहे. 'भाजप ठरवणार. भाजप मागणी करणार. भाजपची लोकं निर्णय घेणार. भाजप लोकांना अटक करणार. लोकांना दंडही भाजप ठोठावणार. ही लोकशाही आहे का?', असा संतप्त सवाल नवाब मलिक यांनी केला आहे. वाचा: आम्ही बोलू तोच कायदा. आम्ही बोलू तेच होणार, इतकी लोकशाहीची थट्टा कधीही होऊ शकत नाही, असे सांगताना पश्चिम बंगालचा दाखला देत मलिक यांनी भाजपवर निशाणा साधला. भाजपने देशात भयाचे वातावरण तयार केले आहे. लोकांवर राजकीय दबाव आणला जात आहे. पश्चिम बंगालमध्ये हेच करण्यात आले. मात्र हे बंगाल मॉडेल फेल ठरलं हे भाजपने लक्षात ठेवावे, असे मलिक यांनी सुनावले. भाजपला महाराष्ट्रात बंगाल मॉडेल करायची इच्छा असेल तर ते त्यांनी जरूर करावे. भाजपच्या डावपेचाला महाविकास आघाडीतील एकही पक्ष घाबरत नाही, असे आव्हानही मलिक यांनी दिले. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3w1CTbm

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.