Type Here to Get Search Results !

coronavirus in maharashtra update: मोठा दिलासा! राज्यात आज करोनाचे हजारावर रुग्ण झाले बरे; ६९९ नवे रुग्ण

मुंबई: राज्यात आज मंगळवारी करोनाच्या (Coronavirus) दैनंदिन रुग्णसंख्येत वाढ झाली असली तरी एकूण सक्रिय रुग्णसंख्येत घट आहे. तसेच, बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही आज वाढल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र, मृत्यूसंख्येत काहीशी वाढ झाली आहे. आज राज्यात एकूण १९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर दिवसभरात १ हजार ०८७ बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तसेच आज ६९९ नव्या करोना रुग्णांचे निदान झाले आहे. तर, राज्यात आज ६ हजार ४४५ रुग्णांवर (सक्रिय रुग्ण) उपचार सुरू आहेत. ही माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे. (maharashtra registered 699 new cases in a day with 1087 patients recovered and 19 deaths today) राज्यात आजपर्यंत एकूण ६४ लाख ८८ हजार ६८० करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.७२ टक्के झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६ कोटी ६२ लाख ५५ हजार ५५४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६६ लाख ३९ हजार ९९५ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. हे प्रमाण १०.०५ टक्के इतके आहे. सध्या राज्यात ७७ हजार ६४२ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत, तर ८९६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. याबरोबरच, राज्यात आतापर्यंत मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या १ लाख ४१ हजार १९४ इतकी आहे. क्लिक करा आणि वाचा- मुंबईत आज १८९ नवे रुग्ण मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत आज बुधवारी १८९ नव्या करोना रुग्णांचे निदान झाले आहे. तर मुंबईतील करोना बाधितांची आजपर्यंतची एकूण संख्या ७ लाख ६४ हजार १७५ इतकी झाली आहे. तसेच मुंबईत गेल्या २४ तासांमध्ये १ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, आजपर्यंत मुंबईत करोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या १६ हजार ३५२ इतकी आहे. क्लिक करा आणि वाचा- ठाणे जिल्ह्यात आज एकूण १०३ नवे रुग्ण ठाणे जिल्ह्यात आज मंगळवारी १०३ नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. यांपैकी ठाण्यात १३, ठाणे महापालिका क्षेत्रात ४०, नवी मुंबई मनपा क्षेत्रात ३७, कल्याण-डोंबिवली मनपा क्षेत्रात ११, तर उल्हासनगर मनपा क्षेत्रात ०, मिरा-भाईंदर मनपा क्षेत्रात २ रुग्ण आढळले आहेत. तर, पालघरमध्ये आज १ रुग्ण आढळला असून, वसईविरार मनपा क्षेत्रात १६, रायगडमध्ये ७ आणि पनवेल मनपा क्षेत्रात ७ नवे रुग्ण आढळले आहेत. क्लिक करा आणि वाचा-


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3oF8gZ3

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.